मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ते म्हणाले की, सध्याच्या सरकारला अंतरिम दिलासा आहे. अध्यक्षांनी लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा. त्यांनी चुकीचा निर्णय दिल्यास आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांवर केलेल्या टिप्पणीबाबत उद्धव म्हणाले की, त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कामाबद्दल मला वाटते, त्यांच्यावर खटला व्हायला हवा. राज्यपाल जर कोणत्याही कायद्याच्या कक्षेत येत नसतील, तर त्याचा अर्थ असा नाही की ते त्यांना हवे ते करू शकतात.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारला डिवचले आहे. यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. जनतेला सर्व कळते आहे. पोपट मेलेला आहे हे जाहीर करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविली असल्याचे ठाकरे म्हणाले.
https://twitter.com/OfficeofUT/status/1656900285502230530?s=20
Uddhav Thackeray on Supreme Court Verdict