India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खरी शिवसेना कुणाची? १६ आमदारांचे काय होणार? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले…

India Darpan by India Darpan
May 12, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लागले आहे. नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यांनी दूरध्वनीद्वारे माध्यमांशी संपर्क साधला आहे. विविध विषयांबाबत त्यांनी माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, राजकीय पक्ष म्हणून शिवसेना हा खरा कोणता गट आहे? आता सर्व प्रथम ते ठरवावे लागेल. योग्य वेळेत मी ही प्रक्रिया पूर्ण करेन आणि त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघेल.

राहुल नार्वेकर सध्या लंडनमध्ये असून, मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. राजकीय पक्षाला मान्यता देण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांवर सोपवली आहे. मी ही प्रक्रिया योग्य वेळेत पूर्ण करेन. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार, सर्व याचिकाकर्त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. या प्रक्रियेत दाव्यांची तपासणी आणि चर्चाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवण्याची आपली भूमिका कायम ठेवल्याचा दावाही नार्वेकर यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेणे हा सभापतींचा विशेषाधिकार असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. मी सतत सांगत आलो आहे की (या विषयावर) निर्णय अध्यक्षांनाच घ्यायचा आहे.

Assembly Speaker Rahul Narvekar on Supreme Court Verdict


Previous Post

आज पुन्हा उद्धव ठाकरे कडाडले… शिंदे सरकारला दिला हा इशारा… निकालाच्या अनेक बाबी केल्या स्पष्ट

Next Post

उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी? उष्माघाताची कारणे आणि लक्षणे काय? उपचार कसे करावेत?

Next Post

उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी? उष्माघाताची कारणे आणि लक्षणे काय? उपचार कसे करावेत?

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group