मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली.
त्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, खरंच महाराजांच्या अपमानाची थोडीही जाणीव होत असेल तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितलेली माफी हा काँग्रेस आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सततच्या निषेधाचा अन् आक्रमक भूमिकेचा परिणाम आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकत नाही हे आज पुन्हा एकदा सिध्द झाले. खरंच महाराजांच्या अपमानाची थोडीही जाणीव होत असेल तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.
मोदी जी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही हटवले नाही तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला हटवल्या शिवाय राहणार नाही.
महाराष्ट्र धर्माच्या लढाईची ही फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्र यांना माफ करणार नाही आणि यांनी केलेला महाराष्ट्रद्रोह विसरणारही नाही. आम्ही महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. जय भवानी जय शिवाजी!