नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण उत्सव असून दरवर्षीप्रमाणे हा उत्सव शांततेत, उत्साहवर्धक वातावरणात व निर्विघ्नपणे साजरा करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित गणेशोत्सव शांतता बैठक व गणेशोत्सव-2023 च्या गणेश मंडळाला पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. यावेळी आमदार सिमा हिरे, गणेशात्सव महासंघाचे अध्यक्ष समीर शेटे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ-2 च्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव उत्साह, शांतता व कोणताही अनुचित प्रकार न घडता गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी गणेशमंडळानी तसेच सर्व नागरिकांनी समन्वयाने सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी केले. शहरातील रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा पुरवाव्यात. राज्य सरकारने राज्यस्तरीय गणेशात्सवातील उत्कृष्ठ मंडळांना पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या राज्यस्तरीय पारितोषिकामध्ये नाशिकला पारितोषिक मिळण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रयत्नशील रहावे. सन 2023 मध्ये ज्या गणेश मंडळाला पारितोषिक मिळाले आहे. त्या मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. गणेश उत्सवातून नाशिकचे नावलौकिक उंचविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे, असे अवाहनही श्री. भुसे यांनी केले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, यंदाचा गणेशात्सव आनंदात, उत्साहपुर्ण वातावरणात व शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी श्री. कर्णिक यांनी केले.
अधीक्षक अभियंता (महावितरण) श्री. पडळकर यावेळी म्हणाले, गणेशोत्सव काळामध्ये वीजेचा अखंडित पुरवठा होईल, याबाबत महावितरण विभागाकडुन योग्य दक्षता घेण्यात येणार आहे.
सन 2023 च्या गणेशोत्सव मंडळाला असे मिळाले पारितोषिक :
परिमंडळ-1
वेलकम सहकार्य मित्रमंडळ, सोमवार पेठ, भद्रकाली- प्रथक क्रमांक- रु. 75000/-
कैलास मित्र मंडळ, मखमलाबाद नाका, पंचवटी-द्वितीय क्रमांक- रु. 31000/-
अण्णासाहेब मुरकुटे कला, क्रीडा व सांस्कृतिम मित्र मंडळ, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक-तृतीय क्रमांक- रु. 11000/-
सार्वजनिक वाचनालय, टिकळ पथ, नेहरु गार्डन, नाशिक-उत्तेजनार्थ- रु. 4100/-
शिवराज फाउंडेशन वृदांवन नगर, आडगांव, नाशिक-उत्तेजनार्थ- रु. 4100/-
परिमंडळ-2
सातपूरचा राजा, सार्वजनिक गणशोत्सव समिती, सातपूर कॉलनी, नाशिक- प्रथक क्रमांक (संयुक्तपणे विभागून)- रु.37500/-
शिव कपालेश्वर युवा प्रतिष्ठान, जाधव संकुल, अंबड, नाशिक-प्रथक क्रमांक (संयुक्तपणे विभागून)- रु. 37500/-
एकता विविध विकास सेवा संस्था, मंडळ, राजरत्ननगर, सिडको, नाशिक-द्वितीय क्रमांक (संयुक्तपणे विभागून) – रु.15500/-
कपालेश्वरचा राजा मित्र मंडळ, आर्टीलरी सेंटर रोड, नाशिक रोड, नाशिक द्वितीय क्रमांक (संयुक्तपणे विभागून) – रु.15500/-
बालाजी सोशल फाउंडेशन, रेजिमेंटल प्लाझा, नाशिक रोड, नाशिक -तृतीय क्रमांक- रु. 11000/-
रिक्षा चालक-मालक संघटना, बिटको पाँइंट, नाशिक -उत्तेजनार्थ-रु. 4100/-
राजे छत्रपती मित्र मंडळ,राजे छत्रपती जिम मागे, जुने सिडको, नाशिक-उत्तेजनार्थ- रु. 4100/-सन 2023 च्या गणेशोत्सव मंडळांना सर्व पारितोषिकांची रक्कम लायन्स क्लब ऑफ मेट्रो, नाशिक यांच्यावतीने देण्यात आली. तसेच गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अडचणी व सूचना मांडण्यात आल्या. सदर शांतता बैठकीसाठी शहरातील विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.