मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘कॉफी विथ करण’च्या गिफ्ट हॅम्पर मध्ये नक्की काय असते? घ्या जाणून..

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 23, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
karan johar e1669133016706

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – करण जोहरच्या शोमधून अनेक सेलिब्रेटींची वैयक्तिक आणि खासगी गुपितं उघड होतात. या शोचा ७ वा सीझन नुकताच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाला. हा शो इतरही वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. या शोबद्दल दोन गोष्टी सर्वाधिक चर्चेत असतात ते म्हणजे शोचा ‘रॅपिड फायर राउंड’ आणि रॅपिड फायर जिंकल्यानंतर मिळणारं गिफ्ट हॅम्पर. हे हॅम्पर जिंकण्यासाठी सेलिब्रेटी शोमध्ये भांडताना आणि अतिशय मजेशीर उत्तरे देताना दिसतात. या हॅम्परमध्ये नक्की काय असतं याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये दिलं जाणारं गिफ्ट हॅम्पर अनेकांसाठी कुतुहलाचा विषय आहे. कोट्यवधीची संपती असलेल्या कलाकारांनाही याचा मोह आवरत नाही. करणकडून दिल्या जाणाऱ्या या हॅम्परमध्ये नक्की काय असतं, याची सर्वांनाच उत्सुकता असते. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये करण जोहरने याविषयीचा खुलासा केला आहे.

करण जोहरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो या हॅम्परमध्ये दिलेल्या सर्व गोष्टी सांगत आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांपासून ते खव्याच्या मिठाईपर्यंत अनेक वस्तू या हॅम्परमध्ये दिल्या जातात. करण जोहरचा ज्वेलरी ब्रँड, मार्शल एक्टन II स्पीकर्स, ऑडी एस्प्रेसो मोबाइल, अमेझॉन इको शो १०, वाहदम टी अँड टी मेकर सेट, न्यूहॉस चॉकलेट्स कलेक्शन डिस्कवरी बॉक्स, बॉम्बे स्वीट शॉप, खोया स्वीट, २८ बेकर स्ट्रीट, कॉफी विथ करणचा कॉफी कप ही सर्व गिफ्ट सेलिब्रिटींना दिले जातात.

‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनमध्ये रणवीर सिंह, आल‍िया भट्ट, कतरीना कैफ, स‍िद्धार्थ मल्‍होत्रा, विक्‍की कौशल, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्‍या पांडे, सामंथा रुथ प्रभू, अक्षय कुमार, क‍ियारा आडवाणी, शाह‍िद कपूर यांनी सहभाग घेतला होता. या कलाकारांचे एपिसोड यंदा बरेच गाजले होते.

TV Show Coffee With Karan Gift Hamper Surprise

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

UGCचा मोठा निर्णय! आता ३ नाही तर ४ वर्षे शिक्षणानंतरच मिळणार पदवी; विद्यार्थ्यांना असेल हा पर्याय

Next Post

बिबट्याचा मध्यरात्री थरार; दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
20221123 112744

बिबट्याचा मध्यरात्री थरार; दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011