मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. आपल्या मनातील भावना अनामिका व्यक्त करू शकेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. प्रत्येकासाठीच पहिल्या प्रेमाचे आयुष्यात खूप विशेष स्थान असते आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचे राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
दररोज रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारत आहे. तसेच चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफुल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची ही फ्रेश व युथफुल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली. विशेष म्हणजे ही मालिका सुरू झाली तशी अल्पावधीत लोकप्रिय झाली. सौरभच्या भूमिकेत असलेला स्वप्निल जोशी आणि अनामिकाच्या भूमिकेत असलेल्या शिल्पा तुळसकरची केमिस्ट्रीही चाहत्यांना भावली. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1564888488776179714?s=20&t=XP3DMlE9K6bc2tNTrou35g
या मालिकेत सौरभ आणि अनामिकाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघंही लग्न करण्याच्या तयारीत असताना आता एका व्यक्तिच्या रूपात या जोडप्यापुढे नवं संकट येणार आहे. होय, मालिकेत आता एका नव्या कॅरेक्टरची एन्ट्री होणार आहे. हे नवं कॅरेक्टर कोण तर अनामिकाचा नवरा आकाश जोशी होय. या मालिकेत सध्या अनामिका सौरभकडे राहायला आली आहे. आता हे दोघे नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. पण अचानक अनामिकाचा भूतकाळ तिच्यासमोर येणार आहे. तिचा पहिला नवरा मालिकेत दिसणार आहे. त्यामध्ये आकाशची दमदार एंट्री दाखवली आहे.
दरम्यान, प्रोमोमध्ये सौरभ त्याच्या लग्नाची पत्रिका फायनल करत असतो. तो पत्रिकेत अनामिकापुढे सौरभचं नाव टाकायला सांगतो. तो अनामिका असं म्हणतो तेवढ्यात आकाशाची एंट्री होते आणि तो अनामिका आकाश जोशी असं नाव सांगतो. त्यामुळे सौरभ गोंधळतो. आता सौरभला तो अनामिकाचा पहिला नवरा आहे हे कधी समजेल आणि त्यानंतर अनामिका व सौरभच्या नात्यात कोणतं वळण येईल, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तसेच अनामिकाचा पहिला नवरा आकाश जोशी याची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घ्यायलही तुम्ही उत्सुक असाल. तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. तर अभिनेता अशोक समर्थ आकाशची भूमिका साकारतो आहे. आकाशने मराठी व बॉलिवूड सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
TV Serial Tu Tevha Tashi New Entry Twist
Zee Marathi Entertainment Swapnil Joshi Shilpa Tulaskar