India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘गांधी-गोडसे’ चित्रपटावर तुषार गांधी यांनी दिली ही प्रतिक्रिया…

India Darpan by India Darpan
January 19, 2023
in मनोरंजन
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडच्या काळात इतिहासाला उजाळा देणारे अनेक चित्रपट येताना दिसतात. यातील ‘काश्मीर फाईल्स’ सारखे चित्रपट चांगलेच वादात सापडतात. यावरून अनेक मतमतांतरे समोर आली. टोकाचा विरोध आणि टोकाचे समर्थनही करण्यात आले. ‘ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट तर समोर आलाच नाही. याच पठडीत आता एक नवीन चित्रपट येऊ घातला आहे. ‘गांधी – गोडसे युद्ध विचारोंका’ हा नवीन चित्रपट येऊ घातला आहे.

एखाद्या विषयावर, सामाजिक मुद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा हातखंडा आहे. ‘घायल’, ‘घातक’, ‘दामिनी’, अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करत संतोषी यांनी समाजातील मुद्दे अधोरेखित केले. आता त्यांचा ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट येत आहे. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसते. नुकताच याचा ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला आहे. चिन्मय मांडलेकर यात नथुरामच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र यावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी टीका केली आहे.

गांधी वधानंतर तुरुंगातील नथुरामला भेटायला गांधी जातात असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात त्यांना एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे. यावर नुकतंच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी यावर भाष्य केलं आहे. हत्या करणाऱ्या लोकांचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांचा चित्रपट पाहायची मला मुळीच इच्छा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार ते म्हणाले, “मला याचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही कारण गोडसे हा त्यांच्यासाठी नायक आहे, आणि जर ते त्याला नायकासारखं सादर करणार असतील तर त्यात कुणालाच आश्चर्य वाटायला नको. चित्रपट किती योग्य आणि अयोग्य यावर मी भाष्य करणार नाही, आणि मारेकऱ्यांचं उदात्तीकरण करणारा चित्रपट पहायचा माझा हेतूही नाही.

इतकंच नाही तर राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या ‘द लेजेंड ऑफ भगत सिंह’ या चित्रपटात गांधीजींचं पात्र अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर केलं असल्याचंही तुषार गांधी यांनी निदर्शनास आणून दिलं. तब्बल ९ वर्षांनी इतिहासातील एका महत्त्वाच्या आणि वादग्रस्त घटनेला हात घालायचं काम राजकुमार संतोषी करत आहेत. प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक असल्याचं दिसत आहे. या ट्रेलरलाही लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tushar Gandhi Reaction on Gandhi Godse Film


Previous Post

मराठी चित्रपटाच्या निर्मितीला तब्बल १ कोटींचे अनुदान; मुनगंटीवार यांची घोषणा

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023

ही पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय; युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group