बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महात्मा गांधींचे पणतू तुषार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केला हा अतिशय गंभीर आरोप

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 21, 2022 | 1:23 pm
in संमिश्र वार्ता
0
Tushar Gandhi e1669017023420

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर देशभर राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील सावरकरांसंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधींनी सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे. राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, तर त्यांच्या या भूमिकेवर भाजपा मात्र आक्रमकपणे त्यांना लक्ष्य करत आहे. शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडीमध्येही फूट पडू शकते असा इशारा दिला आहे. आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी एक ट्विट केले आहे.

तुषार गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं,” असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरु होताच त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कोणताही आरोप केला नसून, जे इतिहासात नोंद आहे तेच सांगितल्याचं ते म्हणाले आहेत. “मी कोणताही आरोप करत नसून, जे इतिहासात नमूद आहे तेच सांगितलं आहे.

पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे. त्यानुसार २६, २७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडलं. हेच मी सांगितलं असून, नवीन काही आरोप केलेला नाही,” असं तुषार गांधी म्हणाले.

Savarkar not only helped the British, he also helped Nathuram Godse find an efficient gun to murder Bapu. Till two days before Bapu’s Murder, Godse did not have a reliable weapon to carry out the murder of M. K. Gandhi.

— Tushar GANDHI (@TusharG) November 19, 2022

Tushar Gandhi Big Statement on Svatantryaveer Savarkar
Mahatma Gandhi Nathuram Godse

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यातील नवले ब्रीज अपघात प्रकरणी समोर आली मोठी अपडेट; आज तातडीने होणार ही बैठक

Next Post

किरकोळ वादातून दोघांनी तरूणावर केला धारदार शस्त्राने हल्ला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
प्रातिनिधीक फोटो

किरकोळ वादातून दोघांनी तरूणावर केला धारदार शस्त्राने हल्ला

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011