इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुर्कस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. मंगळवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ एवढी होती. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या वेबसाइटनुसार, मंगळवारीही तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. वेबसाइटनुसार, सकाळी 9.45 च्या सुमारास भूकंपाची नोंद करण्यात आली, रिश्टर स्केलवर 5.5 तीव्रता होती. भूकंपातील एकूण मृतांची संख्या 4300 च्या पुढे गेली आहे. त्याचवेळी, सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या विनाशामुळे आतापर्यंत 1444 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांनंतरही तुर्की आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात सुमारे 100 भूकंपाचे धक्के जाणवले.
https://twitter.com/abierkhatib/status/1622647730110693376?s=20&t=eFYKdcWBmKHJx8jVdy6W9Q
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे चार हजारांहून अधिक इमारती कोसळल्या आहेत. ज्यामध्ये दबून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की या भूकंपात 20 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असून भारतासह जगातील अनेक देशांनी तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्वानपथकासह एनडीआरएफच्या दोन तुकड्या तुर्कीला पाठवल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय साहित्यही पाठवण्यात आले आहे.
https://twitter.com/nytimes/status/1622585112633171971?s=20&t=eFYKdcWBmKHJx8jVdy6W9Q
तुर्कीतील भूकंपानंतर नेदरलँडच्या एका शास्त्रज्ञाचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर, या ट्विटमध्ये, शास्त्रज्ञाने तुर्कीमध्ये मोठ्या भूकंपाचा इशारा दिला होता, जो खरा ठरला. डच शास्त्रज्ञ फ्रँक हुजरबीट्स हे सोलस सिस्टीम भूमिती सर्वेक्षण संस्थेचे संशोधक आहेत. त्यांनी शुक्रवारी ट्विट केले की, आज किंवा उशिरा मध्य तुर्की आणि जॉर्डन-सीरियाच्या परिसरात ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप येऊ शकतो.
https://twitter.com/nanotrades24/status/1622781334384168960?s=20&t=eFYKdcWBmKHJx8jVdy6W9Q
Turkey Earthquake Again Today 4300 Deaths Thousands Injured