बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उत्पादन शुल्कमधील हप्तेखोरी उघड! निफाडला ९ हजाराची लाच घेताना तिघे सापळ्यात; बघा नेमकं काय घडलं?

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 7, 2023 | 11:56 am
in संमिश्र वार्ता
0
Corruption Bribe Lach ACB

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात लाचखोरीला ऊत आला असून गेल्या काही दिवसांपासून सतत लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडत आहेत. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली एसीबीने आक्रमकपणे लाचखोरांवर बडगा उगारला आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यात मोठ्या संख्येने लाचखोर रंगेहाथ पकडले गेले आहेत. त्यात क्लास वन अधिकाऱ्यांपासून कंत्राटी कामगार आणि खासगी एजंट यांचाही समावेश आहे. आता उत्पादन शुल्क विभागातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यात हप्तेखोरी करणारे तिघे सापळ्यात अडकले आहेत. लोकेश संजय गायकवाड (वय ३५, जवान, राज्य उत्पादन शुल्क, फिरते पथक, नाशिक), श्री. पंडित रामभाऊ शिंदे (वय ६०, एक्साईज अकाउंटिंग, रा. निफाड), श्री प्रवीण साहेबराव ठोंबरे (वय ४७, एक्साईज अकाउंटिंग रा. निफाड) अशी या तिन्ही लाचखोरांची नावे आहेत. उत्पादन शुल्कच्या फिरत्या पथकावर असलेल्या जवानासह दोन खासगी एजंट जेरबंद झाल्याने विभागातील गैरकारभार आता आणखी समोर येण्याची चिन्हे आहेत.

निफाड तालुक्यातील एका बार अँड रेस्टॉरंट चालविणाऱ्या व्यवसायिकाकडे या तिघा लाचखोरांनी ९ हजार रुपयांची लाच माहितली होती. हॉटेल व्यवसाय कामात त्रुटी न काढणे, परवाना सुरळीत चालू ठेवणे या मोबदल्यात वार्षिक हप्ता म्हणून ही लाच मागण्यात आली होती. या व्यावसायिकाचे एकूण ३ हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलचे ४ हजार असे एकूण १२ हजार रुपये मागितले. अखेर तडजोडी अंती ९ हजार रुपयांची लाच देण्याचे निश्चित झाले. यानंतर एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात  ठोंबरे हा लाच घेताना रंगेहाथ पकडले गेला. आणि याप्रकरणी ठोंबरे, शिंदे आणि गायकवाड या तिघांवर गुन्हा दाखल करण्याच ेकाम सुरू आहे.

पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक एन. एस. न्याहळदे, पोलिस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला. सापळा पथकामध्ये पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस हवालदार पंकज पळशीकर, नाईक प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, नितीन कराड, चालक परशराम जाधव  यांचा समावेश होता.

एसीबीने आवाहन केले आहे की, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

Nashik Niphad ACB Raid Bribe State Excise Corruption

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक पोलिस आयुक्तालयातील या अधिका-यांच्या झाल्या बदल्या

Next Post

अरे हे काय चाललंय… तुर्कीत आज पुन्हा भूकंप…. नागरिकांमध्ये एकच खळबळ… अद्यापही शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली (Video)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FoUNXO0XgAkqvwN

अरे हे काय चाललंय... तुर्कीत आज पुन्हा भूकंप.... नागरिकांमध्ये एकच खळबळ... अद्यापही शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली (Video)

ताज्या बातम्या

कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सांमजस्य करार 1 1920x1280 1

नाशिक येथील ‘आयटीआय’सह राज्यातील या पाच औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार….विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

जुलै 9, 2025
Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011