शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

त्र्यंबकेश्वर मंदिराची गंभीर दखल; फडणवीसांनी दिले हे आदेश

by Gautam Sancheti
मे 16, 2023 | 11:38 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Trimbakeshwar e1684217274773

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आणि तीर्थाटनासाठी ख्यात असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ऐतिहासिक मंदिरात काही व्यक्तींनी बळजबरी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच या व्यक्तींना अडविण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या घटनेमुळे मंदिर परिसरासह त्र्यंबक शहरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस आणि मंदिर प्रशासनाचा हस्तक्षेपानंतर येथील तणाव निवळला असला तरी ब्राह्मण महासंघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

त्र्यंबकला नेमकं काय घडलं
राज्यात अकोला आणि नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दंगल उसळली. त्याचेच पडसाद स्वरुप त्र्यंबकेश्वरमध्ये चिंताजनक प्रकार घडला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरी घुसण्याचा प्रयत्न काही व्यक्तींनी शनिवारी (१३ मे) सायंकाळच्या सुमारास घडला. मात्र मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तींना मंदिरात जाण्यास मज्जाव घातला. तरीही या व्यक्तींनी मंदिरात जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे मंदिराच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अशी आली परिस्थिती नियंत्रणात
परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा मंदिराच्या ठिकाणी हजर झाला. पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर हा तणाव निवळला. मात्र, त्र्यंबक देवस्थान आणि ब्राम्हण महासंघाबरोबरच इतर संघटनांनी या प्रकाराबाबत पोलिसांशी पत्र व्यवहार केला आहे. घडलेली घटना गंभीर असून संबंधित व्यक्तींना मंदिरात प्रवेश का करायचा होता? असा प्रश्नही त्यात विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे.

फडणवीसांनी दिले हे आदेश
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.

https://twitter.com/Devendra_Office/status/1658330708509863936?s=20

Trimbakeshwar Temple Devendra Fadnavis Order

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयपीएल उत्कंठावर्धक… हा संघ थेट प्ले ऑफमध्ये… ३ जागांसाठी तब्बल ७ संघांमध्ये जबरदस्त चुरस… अशी आहे गुणतालिका

Next Post

स्टेट बँकेसह या ५ बँकांची तब्बल १०१७.९३ कोटी रुपयांची फसवणूक…. असे झाले उघड…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Shirdi Sai baba e1727984889927
संमिश्र वार्ता

साईबाबा संस्थानच्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक सुरळीत….

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल… अनेक मार्गावर वाहतुकीत बदल

ऑगस्ट 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना शुभ समाचार मिळेल, जाणून घ्या, शुक्रवार, २९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
Next Post
cbi

स्टेट बँकेसह या ५ बँकांची तब्बल १०१७.९३ कोटी रुपयांची फसवणूक.... असे झाले उघड...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011