India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्टेट बँकेसह या ५ बँकांची तब्बल १०१७.९३ कोटी रुपयांची फसवणूक…. असे झाले उघड…

India Darpan by India Darpan
May 16, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण विभागाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून रायगड (महाराष्ट्र) येथील खासगी कंपनी, तिचे संचालक/ हमीदार तसेच मुंबई स्थित एक खासगी कंपनी आणि अज्ञात सरकारी कर्मचारी तसेच अज्ञात व्यक्तींविरोधात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर पाच कन्सोर्टियम सदस्य बँकांचे १०१७.९३ कोटी रुपयांचे (अंदाजे) नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवला आहे.

आरोपींनी २०१२ ते २०१७ या कालावधीत सुमारे ८१२.०७ कोटी रुपये इतके खेळते भांडवल, मुदत कर्ज आणि एनएफबीचा लाभ घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर ५ कन्सोर्टियम सदस्य बँका म्हणजेच बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांची फसवणूक करण्याचा कट रचला. तसेच आरोपींनी कट रचून एसबीआय आणि इतर ५ कन्सोर्टियम सदस्य बँकांना काल्पनिक विक्री/ खरेदी व्यवहार करून फसवले तसेच खात्यांमध्ये गैरव्यवहार केले.

थकित कर्जाचा भरणा न केल्याने सुमारे १०१७.९३ कोटी रुपये (अंदाजे) निधी देखील लुटला, असा आरोपही करण्यात आला. या प्रकरणी दिल्ली, मुंबई, रायगड आणि ठाणे (महाराष्ट्र) यासह ९ ठिकाणी आरोपींच्या निवासस्थानी आणि अधिकृत जागेवर छापे टाकण्यात आले आणि दोषी दस्तावेज / सामग्री जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

5 National Banks 1017 Crore Fraud CBI Raid


Previous Post

त्र्यंबकेश्वर मंदिराची गंभीर दखल; फडणवीसांनी दिले हे आदेश

Next Post

लाचखोर डीडीआर सतीश खरेच्या घरी सापडले एवढे घबाड; एसीबीकडून कसून चौकशी सुरू

Next Post

लाचखोर डीडीआर सतीश खरेच्या घरी सापडले एवढे घबाड; एसीबीकडून कसून चौकशी सुरू

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group