त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी नव्या वर्षामध्ये तब्बल सात दिवस बंद राहणार आहे. तशी माहिती मंदिर देवस्थानने दिली आहे. त्यामुळे जर नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही मंदिरात दर्शनासाठी जाणून असाल तर आधी हे वृत्त जाणून घ्या.
त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ५ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. मंदिराचे संवर्धन कार्य भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केले आहे.
असा आहे इतिहास
त्र्यंबकराजाच्या पिंडीचा वज्रलेप निखळू लागल्याने संवर्धन काम हाती घेण्यासाठी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर केंद्रीय पुरातत्व खात्याच्या आखत्यारित येते. यापूर्वी त्र्यंबकेश्वराच्या पिंडीला वज्रलेप १६ वर्षांपूर्वी म्हणजेच दि. २२ फेब्रुवारी २००६ च्या रात्री तत्कालीन विश्वस्त आणि मंदिराशी संबंधितांनी पुरातत्व सहकार्याने करण्यात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी दुपारच्या पूजकांनी त्यास हरकत घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी वज्रलेप करताना देवाचा मूळ आकार बदलला असल्याचे त्यांचे म्हणणे होते.याबाबत तेव्हाच्या खासदारांमार्फत हा प्रश्न थेट लोकसभा अधिवेशनात पोहचला होता. त्यानंतर सोळा वर्षांत हा वादग्रस्त वज्रलेप निघण्यास सुरुवात झाली आहे. त्यावेळी झालेल्या वज्रलेपाचे कोटिंग करण्याची प्रक्रिया बाकी होती. त्यामुळे असे घडत असल्याचे म्हटले जात आहे.
असा आहे पंचनामा
दिनांक १६ रोजी प्रातःकालचे पूजक समीर दशपुत्र नित्य पूजा करीत असताना सकाळी ८.३० ते ८.४० यादरम्यान अचानक त्र्यंबकराजांच्या मुख्य पिंडीतील श्री ब्रह्मदेव व श्री शंकरदेव यांच्या लिंगावरील गोल आवरणाचे काही भाग निघाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी देवस्थानचे शागीर्द सुरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. त्र्यंबकराजांच्या पिंडीतील निघालेले देवांचे भाग सुरेंद्र कुलकर्णी यांनी देवस्थानचे सुरक्षा अधिकारी योगेश सोलंकी यांच्याकडे जमा केले. पिंडीच्या निखळलेल्या वज्रलेपाचे दोन भाग असून, दोन बाय
दोन इंच आकाराचे आहेत. त्यातील एक भाग थोडासा लांबगोल असून, दुसरा चपट, पातळ आकाराचा आहे. यावेळी गर्भगृहात पुजारी कैलास देशमुख, आकाश तुंगार उपस्थित होते.
तातडीने उपाययोजनांची आवश्यकता
त्र्यंबकराजाच्या पिंडीवर जागोजागी खळगे निर्माण झाले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांची अगोदरच झीज झालेली होती. आता त्यावर केलेला वज्रलेप निघत असून आतील झीज झालेला भाग नजरेस येत आहे. पिंडीचे आणि आतील खळग्यांचे कंगोरे झिजले आहेत. शुक्रवारी असाच एक कंगोरा दोन ठिकाणी निघाला असून, बाजूचा निघण्याच्या स्थितीत आहे.
Trimbakeshwar Temple Closed Jyotirlinga Archeology Trust