त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गोंधळ निर्माण झाला. त्याप्रकरणी राज्य सरकारने अतिरीक्त पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. हे पथक आज तपासासाठी त्र्यंबकमध्ये दाखल झाले आहे.
अतिरिक्त पोलिस महासंचालक सुफिंदर सिंह यांच्या नेतृत्वातील हे पथक चौकशीसाठी येथील विश्रामगृहावर दाखल झाले. त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्तांची चौकशी पूर्ण झाली आहे. एसआयटीने देवस्थानच्या ४ विश्वास्तांना बोलावले होते. त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या चौकशीत त्र्यंबकेश्वरमधील परंपरेबाबत विचारणा करण्यात आली. तशी माहिती विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी दिली. मात्र, चादर चढवण्याची कुठलीही परंपरा नसल्याचे विश्वस्तांनी एकमताने एसआयटीला सांगितल्याचे सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले.
चौकशीसाठी दाखल झाले असता एसआयटी प्रमुख सुखविंदर सिंह म्हणाले की, त्र्यंबकेश्वर मध्ये १३ तारखेला जी घटना घडली याबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहेत. या सगळ्या घटनेची माहिती देखील आम्ही घेत आहोत. नक्की काय आणि कसे घडले. त्यावेळी तेथे कोण उपस्थित होते. काही लोकांना आम्ही आज भेटलो . आणखी काहीना भेटायचे आहे. या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर घटनेप्रकरणी एसआयटी चौकशीचे पथक त्रंबकेश्वर मध्ये दाखल तपास सुरू pic.twitter.com/Y0FMv6gM2x
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 19, 2023
Trimbakeshwar Special Investigation Team Enquiry