त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. एकुण ८ गणांपैकी ७ गण अनुसुचित जमातीसाठी राखीव तर १ गण सर्वसाधारण झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी ४ गटांपैकी ३ गट सर्वसाधारण तर १ गट अनूसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. आरक्षण सोडतीमुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प, नाशिक, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, तहसिलदार,दिपक गिरासे, गटविकास अधिकारी किसन खताळे, प्रभारी निवासी नायब तहसीलदार स्वप्निल सोनवणे, प्रशासन नायब तहसीलदार सतिश निकम आदींसह राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील गणांचे आरक्षण पुढील प्रमाणे ८ गणापैकी अंजंनेरी, देवगाव व खरशेत हे तिन गण अनुसुचित जमाती करिता राखीव झाले आहे. बेरवळ, मुलवड, हरसुल, वाघेरा हे चार गण अनुसुचित जमाती महिला करिता आरक्षित झाले आहे तर तळेगाव (त्र्यं) हा गण सर्वसाधारण झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी वाघेरा, हरसुल आणी बेरवळ हे गट सर्वसाधारण झाले आहे. तर अंजंनेरी गट अनुसुचित जाती करिता राखीव झाला आहे.