नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे वीस वर्षात नाशिक जिल्ह्यात बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो. दरवर्षी सुमारे दहा ते पंधरा बिबटे जिल्ह्यातील विविध भागात मानवी वस्तीत संचार करीत स्त्री – पुरुष लहान बालके किंवा अन्य पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात गेल्या दोन-तीन वर्षात या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विशेषतः गेल्या आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका बिबट्याच्या मादीने तीन बालिकांवर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यामुळे आता बिबट्याला रेस्क्यू कॅम्प मध्ये पाठविणे आयोजित थेट जन्मठेप देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे अशा प्रकारची ही घटना पहिल्यांदाच घडणार आहे.
अशी सापडली मादी
त्र्यंबकेश्वरच्या पिंपळद परिसरात ३ बालिकांना ठार मारणाऱ्या बिबट्याला कायमस्वरूपी पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात येणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तयारी केली होती. मात्र बिबट्या काही हाती लागत नव्हता. मयत झालेल्या बालिकेच्या स्वॅबसोबत हे नमुने जुळून आल्यास बिबट्या मादीला कायमस्वरूपी जन्मठेप भोगावी लागू शकते. गेल्या दिड महिन्यांपासून वन विभागाला चकवा देणारा बिबट्या अखेर सोमवार (दि. २२) रोजी दुपारी जाळ्यात सापडला. या बिबट्या मादीचा स्वभाव आणि वर्तवणूक अत्यंत विचित्र व घातक स्वरूपाची असल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याचे रक्त नमुने पुण्यात डीएनए चाचणीसाठी पाठवले जाणार आहे.
इतिहासातील पहिलीच घटना
मयत झालेल्या बालिकेच्या स्वॅबसोबत हे नमुने जुळून आल्यास बिबट्या मादीला कायमस्वरूपी जन्मठेप भोगावी लागू शकते, असे वनविभागाचे म्हणणे आहे. असे घडल्यास इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बिबट्याला जन्मठेप होऊ शकते. यामुळेच शार्प शुटरला बोलावून गोळी घालण्याचीही तयारी वन विभागाने केली होती. मात्र अखेर बिबट्या वन पथकाच्या नजरेत आला आणि पथकाने चारही बाजूने त्याभोवती जाळ्या टाकून बिबट्याला जेरबंद केले. मयत देविकाच्या जखमांचे रक्त नमुने यापूर्वीच वन विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. बिबट्याचे रक्त नमुने संकलित केले जाणार असून ते पुण्यात पाठवण्यात येणार आहे. अहवालात मयत बालिकांच्या स्वॅबसोबत बिबट्याच्या स्वॅबचे नमुने जुळून आल्यास बिबट्याला कायमस्वरूपी पिंजऱ्यात बंदिस्त केले जाणार आहे.
Trimbakeshwar Man Eater Leopard Punishment