मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबकेश्वर – संचारबंदीचं पालन करीत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला लागली चंदनाची उटी

by India Darpan
मे 7, 2021 | 2:49 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210507 WA0013

त्र्यंबकेश्वर –   संचारबंदीचं तंतोतंत पालन करीत हरिनामाचा जयघोष आणी भगवद् गितेतील श्लोक म्हणत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची उटी  लावण्यात आली. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी भाविकांविना उटी लावण्यात आली.

भुतलावरील सजीव सृष्टी प्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तीभावनेतुन चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहा तील विठ्ठल, रुक्मीणी, आदिशक्ती  मुक्ताबाई यांच्या मुर्तीना चंदनाच्या उटीचे पारंपारीक पध्दतीने लेपन करण्यात येते  सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे .

या निमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. त्या अंतर्गत सात दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासुन उटी तयार करतात. लहान मुले व पुरुष देखील या कार्यात सहभाग घेतात.  एकादशी पर्यंत चारही देवतांना पुर्णपणे लेपन होईल एवढी चंदनाची उटी तयार होते.
मात्र यावर्षी देशाभर कोरोना व्हायरसचे तांडव सुरु आहे. यापासुन होणारा संसर्ग टाळण्यासाठी  श्री निवृत्तिनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज होणारी उटीची वारी देखील मागील वर्षाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. संचारबंदी मुळे बाहेरगावाहुन कोणीही भाविक येणार नाही. त्यामुळे पौर्णिमे पासूनच संस्थानचे पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी व त्यांचे कुटुंबिय, मंदिरातील सेवेकरी, कर्मचारी हे गेले दहा दिवसांपासुन  चंदनाची उटी तयार करीत होते. तसेच परंपरागत पध्दतीने गोसावी परिवाराने पारायण सप्ताह संपन्न केला.

नाथांच्या समाधीची पंचोपचारे पुजा व अभिषेक संपन्न झाल्यावर दुपारी ठिक दोन वाजता पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी  लावण्यास प्रारंभ करण्यात आला. योगेश गोसावी, सच्चिदानंद गोसावी, रश्मी गोसावी, विजय धारणे, ज्ञानेश्वरी गोसावी-धारणे आदींनी देवांना ऊटी लावली. यावेळी संस्थान प्रशासकीय समितीचे कृष्णा सोनवणे, नगर परिषद मुख्याधिकारी संजय जाधव, ह.भ.प. अॅड. भाऊसाहेब गंभीरे, ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.  यानंतर देवांना नवीन पोशाख करून साजशृंगार करण्यात आला. नैवेद्य अर्पण करुन आरती करण्यात आली.

रात्री ११ वाजता समाधीची विधिवत पुजा करुन देवतांना लावलेली उटी उतरविण्यात येईल व शासकीय निर्देशानुसार मंदिर उघडल्या नंतर  भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येईल.  पो .उ. अधिक्षक भिमाशंकर ढोले यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. संदिप रणदिवे, व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता .
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाची लागन लहान मुलांमध्ये, राज्यात होणार बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स

Next Post

पिंपळगाव बसवंत: वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा शहर भाजपची  निवेदनाद्वारे मागणी

India Darpan

Next Post
IMG 20210507 WA0142 e1620399129781

पिंपळगाव बसवंत: वार्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करा शहर भाजपची  निवेदनाद्वारे मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011