मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

GST विरोधात आता व्यापारी आक्रमक; एक दिवसीय भारत बंदची हाक

by Gautam Sancheti
जुलै 10, 2022 | 2:08 pm
in संमिश्र वार्ता
0
gst

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने सर्वांनाच महागाईचा फटका बसत आहे. त्यातच आता जीएसटी परिषदेच्या नव्या धोरणामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्नधान्यासह काही वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्यामुळे महागाई आणखीनच वाढणार आहे. याप्रकरणी व्यापारी वर्गही नाराज असून जीएसटी परिषदेच्या या नव्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे, हा निर्णय मागे न घेतल्यास भारत बंदचा इशाराही व्यापारी संघटनांनी दिला आहे. या संदर्भात येथे  व्यापारांची बैठक झाली आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

जीएसटी परिषदेने खाद्यान्न आणि अन्नधान्य ही जीएसटीच्या परिघात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वसामान्यांना आवडणार नाही, पण आता त्याविरोधात महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनीही विरोध केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुण्यात राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. त्यात राज्यात व्यापा-यांची संघर्ष समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने अन्नधान्यासह खाद्यांन्न वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास व्यापारी एक दिवसीय भारत बंद करावा, असा इशारा देण्यात आला आहे. या व्यापारी परिषदेत अनेक ठराव ही मंजूर करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यास त्याचा भूर्दंड सर्वसामान्यांना तर बसेलच पण व्यापाऱ्यांना ही त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे व्यापा-यांनी हा निर्णय मागे घेण्याचा सरकारला अंतिम इशारा दिला आहे.

अन्नधान्यासह खाद्यान वस्तू आतापर्यंत करमुक्त होत्या. या वस्तूंवर व्हॅटही आकारण्यात येत नव्हता. पण जीएसटी परिषदेच्या नव्या शिफारशीनुसार, पॅकिंग केलेल्या आणि लेकल लावलेल्या डाळी- कडधान्ये, आटा, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू होईल. त्याचा फटका अर्थातच उत्पादक शेतकरी, वितरक व्यापारी आणि खरेदीदार ग्राहकांना बसणार आहे. यासाठी व्यापारी पंतप्रधानांना निवेदन देणार आहेत. तसेच या निर्णयाला विरोध म्हणून दि.१२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील प्रत्येक तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रशासनाला तसेच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे देशभरात छोटे किराणादार जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचा व्यापार करतात. या वस्तूंवर जीएसटी लागू केल्यास तो भरावा लागेल. त्याचा सर्व हिशोब ठेवावा लागेल. त्यासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागेल. मात्र हे छोट्या व्यापााऱ्यांना शक्य नाही. मग व्यापा-यासमोर त्याचा परंपरागत व्यवसाय बंद करण्याची वेळ येईल.

जीएसटी कौन्सिलने चंदीगड येथील आपल्या ४७ व्या बैठकीत सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणाऱ्या आणखी वस्तू आपल्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने प्री-पॅक केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी पॅक केल्यावर धान्यासह अनपॅक न केलेल्या वस्तूंवरही त्याच दराने जीएसटी लागू होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जीएसटी दर पुनरावृत्तीनंतर महाग झालेल्या काही वस्तू खालीलप्रमाणे आहेत – पॅक केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन आणि मटार इ. यावर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे. तसेच चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारले जाणारे शुल्क १८ टक्के जीएसटी लागू करेल. तर अॅटलससह नकाशे आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होईल तसेच आणि प्रिंटिंग व ड्रॉइंग इंक’, शार्प नाइफ, पेपर कटिंग नाइफ आणि ‘पेन्सिल शार्पनर’, एलईडी दिवा, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवर जीएसटी १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Traders aggressive against GST rates hike Bharat Bandh Threat

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या भागात अतिदक्षतेचा इशारा

Next Post

मालेगाव मध्ये पावसातही बकरी ईदची सामुदायिक नमाज पठण

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
20220710 140940

मालेगाव मध्ये पावसातही बकरी ईदची सामुदायिक नमाज पठण

ताज्या बातम्या

crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
1001970699

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षण…असे होता येईल सहभागी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011