नवी दिल्ली – न्यू जनरेशन टोयोटा लँड क्रूझरची सध्या खूप चर्चा सुरू आहे. या कारचे डिझाइन आकर्षक आहेत. सुरक्षेच्या कारणांमुळे या एसयूव्हीची पुनर्विक्री करण्यास कंपनीने बंदी घातली आहे. पुनर्विक्री करणे दूरचीच गोष्ट राहिली, पण ही कार खरेदी करणेच कठीण जात आहे. Toyota Land Cruiser च्या व्हेरिएंटसाठी अनेक वर्षांपासूनचा प्रतीक्षा काळ (वेटिंग पीरेड) सुरू आहे.
नव्या जनरेशेनच्या लँड क्रूझरसाठी कंपनीने प्रतीक्षा काळ चार वर्षांपर्यंत वाढविला आहे, असा दावा Cars Guide च्या वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे पुरवठ्याच्या साखळीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. या एसयूव्हीला जोरदार मागणी आहे, पण टोयोटा कंपनीला कंपोनंट्स (विशेषतः मायकोचिप्स) मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. चार वर्षांचा प्रतीक्षा काळ सर्वांसाठी नसून निवडक व्हेरिएंट्सना देण्यात आला आहे.
एका आठवड्यात २० हजार ऑर्डर
जापानी वाहननिर्माता कंपनी टोयोटाने स्थानिक बाजारात नव्या जनरेशनची लँड क्रूझरसाठी बुकिंग सुरू केली होती. या एसयूव्हीला आतापर्यंत २० हजारांहून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. जापानमध्ये जवळपास ९० टक्के बुकिंग ZX आणि GR स्पोर्ट ट्रिम्ससाठी झाल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे चिपचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी एसयूव्हीसाठी प्रतीक्षा काळ वाढला आहे. गेल्या महिन्यात कंपनी लँड क्रूझरचे उत्पादन करू शकली नाही. या महिन्यातही तीच परिस्थिती कायम राहणार आहे.
दमदार इंजिन
नव्या लँड क्रूझला दोन इंजिनांचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामध्ये ३.५ लिटर ट्विन टर्बोचार्ज्ड V6 डिझेल इंजिन मिळत आहे. पेट्रोल इंजिन ४०९ बीएचपी आणि ६५० एनएमचे पिक टॉर्क जनरेट करते. डिझल इंजिन ३०४.५ बीएचपी आणि ७०० एनएमचे पिक टॉर्क जनरेट करते. दोन्ही इंजिन १० स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटसोब मिळतात.