मुंबई – गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जून महिना हा भारतीय वाहन क्षेत्रासाठी खूप चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण काही काळापासून कोरोना साथीच्या व लॉकडाऊनशी झुंज देत असलेल्या कार बाजाराने आता सुटकेचा श्वास घेतला आहे. वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे. विशेषत: सेडान कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि होंडा या गाड्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे जून मध्ये ग्राहकांनी या विशेष कार खरेदी केल्या, त्या ५ सेडान कारबद्दल जाणून घेऊ या…
होंडा अमेझ
जपानी वाहन निर्माता कंपनी होंडाची कॉम्पॅक्ट सेडान कार अमेझ ही जून महिन्यातील पाचव्या क्रमांकाची विक्री करणारी कार ठरली आहे. या कंपनीने या कारच्या एकूण १,४८७ कारची विक्री केली आहे, जी मागील वर्षी जून महिन्याच्या १३९ युनिटच्या तुलनेत ९६९.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण चार प्रकारांमध्ये उपलब्ध या कारची किंमत ६.२२ लाख ते ९.९९ लाख रुपयांदरम्यान आहे.
ह्युंदाई व्हरना
ह्युंदाईची प्रसिद्ध सेडान कार व्हरनाची विक्रीही जूनच्या या महिन्यात वाढली आहे. या कंपनीने जून महिन्यात या कारच्या एकूण २,१८१ वाहनांची विक्री केली असून ती मागील वर्षीच्या जूनच्या तुलनेत १०१ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण १,०८३ युनिट्सची विक्री केली होती. ही कार बाजारात एकूण चार प्रकारांमध्येही उपलब्ध आहे आणि त्याची किंमत ९.१९ लाख ते १५.२५ लाख रुपयां दरम्यान आहे.
होंडा सिटी
होंडा सिटीचे पाचवे जनरेशनचे मॉडेल भारतीय बाजारात सादर केले गेले. गेल्या वर्षी जून महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण २,५७१ युनिटची विक्री केली आहे, जी मागील वर्षी जून महिन्यात ५८५ युनिटपेक्षा ३३९.४ टक्के जास्त आहे. त्याच्या सध्याच्या मॉडेलची किंमत ९.२९ लाख ते ९.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. तर पाचव्या मॉडेलची किंमत १०.९९ लाख ते १४.९४ लाख रुपयांपर्यंत आहे.
ह्युंदाई एक्सेंट व ऑरा
या दोन्ही कार त्यांच्या विभागात चांगल्या लोकप्रिय ठरत आहेत. मागील वर्षी जून महिन्यात कंपनीने या दोन्ही कारच्या एकूण ३,१२६ कारची विक्री केली आहे, जी मागील वर्षी जून महिन्यातील १,०१६ वाहनांच्या तुलनेत २०७.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, एक्सेंट प्राइमची किंमत ६.३७ लाख ते ७.१७ लाख रुपये आहे. दुसरीकडे, ऑराची किंमत ५.९७ लाख ते ९.३५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
मारुती सुझुकी डिझायर
मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट सेडान कार डिझायर पुन्हा एकदा या सेगमेंटची लीडर बनली आहे. मागील वर्षी जून महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण १२,६३९ वाहनांची विक्री केली असून मागील वर्षी जून महिन्यातील, ५ हजार ८३४ युनिटच्या तुलनेत ११६.६ टक्के वाढ झाली आहे. ही कार फक्त पेट्रोल इंजिनसह, असून कंपनीने मागील वर्षी केवळ आपले डिझेल इंजिन बंद केले. याची किंमत ५.९८ लाख ते ९.०२ लाख रुपयांपर्यंत आहे.