नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमॅटोची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झालेली आहे. किलोला अवघा १ ते ३ रुपये एवढा निच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
नाशिकच्या पेठरोड परिसरात असलेल्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथील रस्त्यावर टोमॅटो फेकून शेतकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला. बाजार समितीच्या गेटवर टोमॅटो फेकल्याने त्यावरून वाहनांची ये-जा होऊ लागली. त्यामुळे टोमॅटोचा अक्षरश: चिखल झाल्याचे पहायला मिळाला. टोमॅटोला अवघा एक रुपया ते तीन रुपये किलो इतका निचांकी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
दिंडोरी तालुक्यातून काही शेतकऱ्यांनी नाशिकच्या बाजार समिती टोमॅटो विक्रीसाठी आणला होता. मात्र कमी भाव मिळाला. यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने हे शेतकरी संतप्त झाले. हे टोमॅटो पुन्हा घरी नेण्यासाठी जास्त पैसे खर्च होतील म्हणूनच शेतकऱ्यांनी हा टोमॅटो रस्त्यावर फेकला.
टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झालेली आहे
टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकच्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून याचा निषेध केला. pic.twitter.com/NR7xPeoeRn— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 18, 2023
Tomato Rates Decreased Farmer Agitation