विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीत आज पुन्हा भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चेला आता उधान आले आहे. पण, ही भेट उद्या नवी दिल्लीत विरोधकांची सर्वात मोठी बैठक होणार असल्यामुळे असल्याचे समोर आले आहे. यात १५ पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या बैठीकचे केंद्रबिंदू हे शरद पवार यांचे निवासस्थान असल्यामुळे पुन्हा देशाचे लक्ष पवारांच्या राजकीय डावपेचाकडे लागले आहे.
कालच शरद पवार हे दिल्लीला गेल्यानंतर आज पहिली भेट प्रशांत किशोर यांनी घेतली आहे. याअगोदर ते मुंबईत भेटले होते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात या भेटीला विशेष महत्त्व होते. पण, ही भेट उद्याच्या बैठकीची असल्याचे समोर आले आहे. या पंधरा पक्षात कोणते पक्ष आहे हे अद्याप समोर आलेले नाही. शरद पवार यांच्या आजारपणावर मंध्यतरी छोटी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून विश्रांतीला सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे सर्व पूर्ननियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यानंतर प्रथमच ते दिल्ली दौ-यावर गेले. त्यामुळे चर्चेला उधान आले होते. पण, आता त्यामागचे कारण समोर आले आहे.