सोमवती- मौनी अमावस्या
आज असणारी सोमवती-मौनी अमावास्या ही अमावस्या विशेष शुभ मानली गेली आहे. आज दुपारी 02:19 पासून उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजून 16 मिनिटांपर्यंत अमावस्या काळ आहे. या दिवसाला नदी स्नान, भगवान शिव दर्शन, अभिषेक, ओम नमः शिवाय जप, पिंपळवृक्ष दर्शन, दानधर्म, उपवास यास विशेष महत्त्व आहे.
अनेक शिवभक्त या दिवशी नवीन कार्यास सुरुवात करतात. सोमवती व शनि अमावस्या यांना शास्त्रात विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी मौन धारण करणे, देवाचे चिंतन-मनन यास देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध प्रकारचे रुद्राक्ष खरेदी करणे, रुद्राक्ष धारण करणे, लघुरुद्र करणे, नवीन संकल्प करणे, शिव मंदिरात अथवा शिवपिंडीवर बेल -फुल पत्र अर्पण करणे, शिवतांडव स्तोत्र पठण अशी धार्मिक कार्य शिवभक्त करतात.
या दिवशी ज्योतिर्लिंग दर्शनाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 3 सोमवती अमावस्या आहेत. त्यात 31 जानेवारी, 30 मे व 24 ऑक्टोबर या तारखांचा समावेश आहे. या दिवशीचा उपवास सोमवारी धरून मंगळवारी सायंकाळी सोडावा लागतो.
ओम नमः शिवाय

व्हॉटसअॅप – 9373913484