गुढीपाडव्याचा सण आणि राहू काळ
आज आहे गुढीपाडव्याचा दिवस. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. भारतीय संस्कृतीत गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या दिवसाचे आणि राहू काळ यांचेही वेगळे समीकरण आहे. ते म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊया….
गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सकाळी अभंग स्नान करून गुढी उभी करावी. ओम ब्रह्म ध्वजाय नमः असे म्हणून गुढीचे पूजन करावे.
ब्रम्ह ध्वज नमोस्तुते
सर्वाभीष्ट फल प्रद/प्रप्ते
स्मीनत्सर नित्य ममगृहे मंगलम करू,
या मंत्राने प्रार्थना करून नंतर पंचांग गस्त गणेश पूजन करावे.
पंचांगातील संवत्सर फळ आपण किंवा गुरुजींकडून वाचावे. प्रसाद म्हणून कडुलिंबाचे चूर्ण खावे.
यावर्षी शोभननाम संवत्सर आहे. वसंत ऋतुची सुरुवात याच दिवसापासून होते. काही आख्यायिकेनुसार श्रीराम आयोध्येमध्ये परत आले तेव्हा प्रभू रामचंद्रांचे स्वागत हे गुढी, तोरणे लावून त्यांच्या प्रजेने केले. म्हणूनच गुढीपाडवा साजरी करण्याची परंपरा आहे.
गुढीपाडवा हा मुहूर्त पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी मुंज, विवाह, वास्तुशांती सारख्या मंगल कार्याखेरीज इतर कोणतेही कार्य करण्यास पंचांग शुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणून आज राहू काळ बघण्याचीही आवश्यकता नाही….
Today Gudhipadwa and Rahu Kal Connection