इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एक हलकी फुलकी कॉमेडी म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झाला. कितीही टेन्शन असो, मूड खराब असो हा कार्यक्रम पाहिल्यावर प्रेक्षक रिलॅक्स होतात. यातील प्रत्येक पात्राची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. यातील पात्र घराघरात लोकप्रिय आहेत. यामुळेच ‘सोनी सब’ टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हीच सर्वात लोकप्रिय मालिका आहे.
गोकुळधाम सोसायटीत राहणारे प्रत्येक एक पात्र हे प्रेक्षकांचे आवडते आहे. त्यातील जेठालालचे वडील चंपकलाल हे पात्र सर्वांचे आवडते आहे. मालिकेत चंपकलाल हे कितीही साधे असले तरी ते करोडपती असून त्यांचं आयुष्य हे अत्यंत आलिशान आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल ! हो तुम्ही वाचलं ते खरं आहे. जेठालाल याचे वडील अर्थात सर्वांचे लाडके चंपकलाल हे देखील मालिकेमधील महत्त्वाचे पात्र आहे.
कित्येक वर्षांपासून चंपकचाचा यांच्या भूमिकेमधून अमित भट्ट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेमध्ये जरी अमित भट्ट यांचे वय जास्त दाखवण्यात आले असले तरीही रिअल लाईफमध्ये अमित भट्ट यांचे वय फक्त ४८ आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी अमित भट्ट याने चंपकलालची भूमिका साकारण्यास सुरूवात केली होती. तेव्हा ते फक्त ३६ वर्षांचे होते. सर्वांनाच माहिती आहे की, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला चांगले मानधन मिळते.
अमित भट्ट याला देखील चंपकलालच्या पात्रासाठी चांगले पैसे दिले जातात. अमित भट्ट यांना एका भागासाठी ७० ते ८० हजार रूपये मिळतात. विशेष म्हणजे दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल याने अमित भट्ट याला मालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली. कोणत्याही प्रकारची मुलाखत न देता अमित भट्ट याला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेमध्ये काम करायला मिळाले. विशेष म्हणजे आत्माराम भिडेंच्या पात्रासाठी मंदार चंदवादकर याला जेवढे मानधन मिळते, तेवढेच मानधन चंपकलालचे पात्र साकारण्यासाठी अमित भट्ट यांना मिळते.
एका रिपोर्टनुसार अमित भट्ट यांची एकूण संपत्ती ३९ कोटींच्या घरात आहे. अमित भट्ट यांना महागड्या गाड्यांचा छंद आहे. मुंबईत त्यांचे आलिशान घर असून अमित तिथे आपल्या दोन मुलं आणि पत्नीसह तिथे राहतात. या फ्लॅटची किंमत अनेक कोटींच्या घरात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमध्ये जेठालाल हा व्यापारी, तारक मेहता एक लेखक, आत्माराम भिडे शिक्षक, अय्यर शास्त्रज्ञ, रोशन सिंह सोडीचे गॅरेज, पोपटलाल पत्रकार, हंसराज हाथी डाॅक्टर असे दाखवण्यात आले आहे. या मालिकेच्या सुरूवातीपासूनच काही कलाकार जोडलेले आहेत. आजही ते मालिकेच्या सोबत आहेत आणि त्याच भूमिकेत आहेत. काही दिवसांपासून मालिकेला अनेक कलाकारांनी अलविदा केले आहे. मात्र, तरीही टीआरपीमध्ये मालिका टाॅपलाच आहे.
TMKOC Champak Chacha Actor Amit Bhat