इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवालाने निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेली १४ वर्षे या कार्यक्रमाशी जोडलेल्या जेनिफरने दोन महिन्यांपासून मालिकेत काम करणं बंद केलं आहे. निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला.”
चुप्पी को मेरी कमजोरी मत समझना
जेनिफर मिस्त्रीची एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “चुप्पी को मेरी कमजोरी मत समझना…मैं चुप थी क्योंकि सलीका है मुझमें. खुदा गवाह है कि सच क्या है. याद रख उसके घर में कोई फर्क नहीं है तुझमें और मुझमें” असं ती या व्हिडीओत म्हणते आहे. जेनिफरने या व्हिडीओमध्ये थेट असित मोदींचं नाव घेतलं नाही. मात्र तरीही तिने हा व्हिडीओ आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट केल्याचं म्हटलं जात आहे. माझे मौन म्हणजे माझी कमजोरी नाही. मी इतके दिवस गप्प होते, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता माझा संयम सुटत चालला आहे. सत्य काय आहे हे देवाला माहिती आहे. त्यामुळे मला काहीही फरक पडत नाही”. असे ती या व्हिडिओमध्ये म्हणते आहे.
नेटकऱ्यांचा पाठिंबा
जेनिफरच्या या व्हिडीओवर घाबरु नको…आम्ही तुझ्यासोबत आहोत. सत्य लवकरच सर्वांना कळेल, गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी, लवकरच तुम्हाला न्याय मिळेल, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत”. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडण्याबद्दल जेनिफर मिस्त्री म्हणाली,”तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडण्याचा मी निर्णय घेतला कारण सोहिल रमानी आणि जतिन बजाज यांनी सेटवर माझा अपमान केला होता. ७ मार्चला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि होळीदेखील होती. त्यावेळी सेटवर मला अपमानित करण्यात आले. जबरदस्तीने सेटवर थांबण्यासाठी धमक्या देण्यात आल्या”.
जेनिफर मिस्त्रीने दोन महिन्यांपूर्वीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली आहे. ६ मार्च २०२३ रोजी तिने शेवटचा एपिसोड शूट केला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे प्रोडक्शन हेड सोहिल रमानी यांनी जेनिफर मिस्त्री बंसीवालानं केलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले,”हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. आम्ही सर्व आरोपांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ”, असेही ते म्हणाले आहेत.
निर्माते असितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया-
“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.
TMKOC Actress Jennifer Mistry Video Share