नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे पिकअपमधील शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडुन रस्त्यावर पडल्या आहेत. नवीन कसारा घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. आयशर, छोटा हत्ती व एक पिकअप या एकमेकांना धडकल्यामुळे ही घटना घडली.
या अपघातामुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. रूट पेट्रोलिंग टीमने अपघातग्रस्त वाहने टोल क्रेनच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.या अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस, रूट पेट्रोलिंग टीमने घटनास्थळी दाखल होते.
या अपघातात इस्तकार इजहर खान (वय २५ ) मुस्तपा खान (वय ३५) यांचा मृत्यु झाला असून वजीर खान हे जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेव्दारे दाखल करण्यात आले आहे.