India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

India Darpan by India Darpan
June 5, 2023
in राष्ट्रीय
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबईने ३ आणि ४ जून रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत १० किलोग्राम सोने जप्त केले आहे.

पहिल्या प्रकरणात शारजाहून मुंबईत एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाईट क्रमांक IX 252 ने आलेल्या दोन प्रवाशांना विशिष्ट माहितीच्या आधारे, विमानतळावर थांबवण्यात आले. या प्रवाशांची तपासणी केल्यावर अंगाभोवती गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये 8 किलो वजनाचे 24 कॅरेटचे परदेशी शिक्का असलेले सोन्याचे ८ बार सापडले. याविषयीच्या अधिक माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत या प्रवाशाच्या आणखी एका साथीदाराला ताब्यात घेण्यात आले. ८ किलो वजनाचे ४.९४ कोटी रुपयांचे सोने बारच्या स्वरुपात आढळले. पहिल्या प्रकरणात तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रकरणात दुबईवरून येत असलेल्या एका भारतीय नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३ जून रोजी चौकशीसाठी थांबवण्यात आले आणि त्याच्या सामानाची तपासणी केली असता ५६ लेडीज पर्स त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या. या सर्व लेडीज पर्सच्या धातूच्या पट्ट्यांमध्ये चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात २४ कॅरट सोने लपवण्यात आल्याचे आढळले. ताब्यात घेतलेल्या या सोन्याच्या तारांचे निव्वळ वजन २००५ ग्रॅम होते आणि त्यांची अंदाजे किंमत सुमारे रु.1,23,80,875/- इतकी होती. या प्रकरणातील संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकरणात वरवर पाहता सुशिक्षित व्यक्तींचा सोन्याच्या तस्करीचे नियोजन आणि कृतीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळले.

या दोन्ही प्रकरणात गुन्हे करण्याचे पूर्णपणे नवे प्रकार दिसून आले, ज्यातून डीआरआय अधिकाऱ्यांना सोन्याच्या तस्करी करणाऱ्या गटांच्या तपासणीमध्ये नियमितपणे निर्माण होत असलेली आव्हाने समोर आली. परदेशी शिक्के असलेल्या आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या चंदेरी रंगाच्या धातूच्या तारांच्या स्वरुपात लपवलेले २४ कॅरट सोने, सोन्याच्या तस्करीच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामधली ठळक घटना ठरली आहे.

या दोन्ही कारवाईत ६.२ कोटी रुपयांचे एकूण १० किलो सोने जप्त करण्यात आले आणि संबंधित प्रकरणांमध्ये ४ प्रवाशांना अटक करण्यात आली. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे.


Previous Post

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

Next Post

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

Next Post

नाशिक - मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

September 29, 2023

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023

या महानगरात केंद्रीय मंत्र्यांने गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे दिले निर्देश

September 29, 2023

संतापजनक ! मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर बलात्कार…. अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत सापडली रस्त्यावर

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group