नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क) – इंधन दरवाढीचा नेमका काय परिणाम होऊ शकतो याची प्रचिती सध्या कझाकिस्तानमध्ये येत आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हजारो नागरिक रस्त्यावर आले. या नागरी उठावामुळे पंतप्रधान अस्कार मामिन यांना राजीनामा द्यावा लागला आहे. राष्ट्रपती कासिम जोमार्ट तोकतावेय यांनी तो स्वीकारावाही लागला आहे. परंतु तरीही सरकारविरुद्ध निदर्शने सुरूच आहेत. कझाकिस्तानमध्ये गॅसच्या किंमती वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला असून सरकारविरुद्ध तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. नागरिकांच्या आंदोलनाची तीव्रता पाहून देशात आणिबाणी लावण्यात आली आहे.
राष्ट्रपती तोकततावेय यांनी सध्या उपपंतप्रधान अलीखान समाइलोव्ह यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून निवडले आहे. कझाकिस्तान सरकारने मंगिस्ताऊ प्रांतात तेलाची किंमत ५० टेंज (कझाकिस्तानी चलन) करण्याची घोषणा केली होती. परंतु हिंसक निदर्शने सुरू असताना देशातील सरकार पायउतार झाल्यानंतरही निदर्शने सुरूच आहेत. त्यामुळे देशाच्या काही भागात दोन आठवड्यांसाठी आणिबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
https://twitter.com/disclosetv/status/1478481734073307138?s=20
देशातील सर्वात मोठे शहर असलेल्या अल्माटीमध्ये हिंसक जमावाने वाहनांना आग लावली. त्यानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पोलिसांना जमावाला शांत करण्यासाठी लाठीमारसह अश्रूधुराचा वापर करावा लागला. आणिबाणीच्या काळात देशात हत्यारे व दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
https://twitter.com/steve_hanke/status/1478766820756639744?s=20
‘सरकारी कार्यालयांवर हल्ला अवैध’
राष्ट्रपतींनी सांगितले की, देशात अशांतता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा राजीनामा स्वीकारला आहे. हिंसक निदर्शने पाहता अल्माटी आणि पश्चिम प्रांत मँगिस्टाऊमध्ये आणिबाणी लावण्यात आली आहे. सरकारी कार्यालयावर हल्ला करणे अवैध पद्धत आहे. आणिबाणीच्या काळात रात्रीची संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे.