इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाळवंट आणि तेलाच्या विहीरी अशीच आपल्याला सौदी अरेबियाची ओळख आहे. मात्र, या देशात आता जगातील पहिले उभं शहर (व्हर्टिकल सिटी) विकसित होणार आहे. या प्रकल्पाला द लाइन असे नाव देण्यात आले असून, हे वन बिल्डिंग शहर असेल. त्याची रुंदी २०० मीटर (६५६ फूट) आणि लांबी १७० किलोमीटर असेल.
जगात पहिल्यांदा एखाद्या देशात असे आश्चर्य घडणार आहे, जिथे शहराचा विस्तार आडवा नाही तर उभा, आकाशाच्या दिशेने होणार आहे. या शहराची लांबी 170 किमी असणार आहे. तर रुंदी 200 मीटर असेल. या शहरात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला केवळ 20 मिनिटे पुरी होणार आहेत. या ठिकाणी हाय स्पीड ट्रेनही धावणार आहेत. या शहराची उंची 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीर असेल. यात घरावरती घरे असणार आहेत. म्हणजे शहराचा विस्तार आडवा न होता उभ्या दिशेने असेल.
सौदी अरेबिया हा आशियातील एक देश आहे, जो अरेबियन महाद्विपचा भाग आहे. सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. येथील लोकसंख्या 3.43 कोटी आहे. आणि येथील भाषा अरेबिक आहे. आजच्या काळात सौदी अरेबिया हा देश हा प्रचंड श्रीमंत मानला जातो, जर सगळे काही योजनेप्रमाणे झाले तर 2025 साली हे शहर बांधून तयार असेल. आपल्या पारंपरिक शहरांच्या रचनांना आणि कल्पनांना यातून छेद मिळणार आहे.
लोकसंख्यावाढीचा विचार करता आगामी काळात अशी शहरे जास्त महत्त्वाची आणि पथदर्शी ठरु शकतील. परग्रहावर तेही चंद्र आणि मंगळावर जाऊन वसाहती उभारण्यापेक्षा, या पृथ्वीतलावर अशी उभी शहरे विकसीत केल्यास आगामी काळात लोकसंख्या आणि पुढच्या पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल असा दावा या नगररचना क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी करीत आहेत.
विशेष म्हणजे या शहराचे नावही ठरवण्यात आले आहे. द लाईन या नावाने हे शहर ओळखण्यात येईल. हे जगातील पहिले व्हर्टिकल शहर असेल. या शहरात ऑफिसेस, घरे, शाळा, उद्यान सगळे काही उभ्या दिशेने असेल. साऊदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिल सलमान यांनी या प्रोजेक्टचे संकेत पहिल्यांदा जानेवारी २०२१ मध्ये दिले होते. हे शहर उभे करण्यासाठी ५०० अब्ज डॉलर्स म्हणजे ३९.९५ लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
https://twitter.com/NEOM/status/1551625819847622657?s=20&t=tifHe-tR15nswlJEMoHcjg
महत्वाची गोष्ट अशी की, द लाईन हे शहर काचेच्या अर्धा किलोमीटर उंच भिंतींनी झाकलेले असेल. हे शहर १०० टक्के अपारंपरिक ऊर्जेवर चालेल. सौरऊर्जा, वायूऊर्जेचा वापर करण्यात येईल. या शहरात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. त्यामुळे कार्बन उत्सर्जनही नसेल. या शहरात १७० किमी अंतरात ९० लाख लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आपल्याकडील पारंपरिक इमारतींनी पसरलेल्या शहराच्या तुलनेत हे शहर उभ्या दिशेने विस्तारलेले असले. थोडक्यात उभे शहर असेल. या शहरात रस्ते नसतील, कार नसतील, त्यामुळे वायूंचे उत्सर्जन होणार नाही. या शहराजवळ हायटेक झोनही विकसीत करण्यात येणार आहे. याचा एकूण विस्तार २६,५०० वर्ग किलोमीटर इतका असेल. यातून या शहाराला पूर्ण सहयोग देण्यात येईल.
This Country Will Develop Vertical City Characteristic
Saudi Arabia