अश्विनी भाटवडेकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बॉलीवूडमध्ये समोर न आलेल्या अनेक प्रेम कहाण्या असतात. अशीच एक कहाणी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेत्री मुमताज हिने नुकताच ७५ वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या न झालेल्या लग्नाची ही कहाणी. उत्कृष्ट अभिनयासाठी ‘जीवनगौरव’ पुरस्कार पटकावणाऱ्या मुमताजला शम्मी कपूर खूप आवडायचे पण त्यांच्या एका अटीमुळे हे लग्न फिस्कटले.
शम्मी कपूर आणि फिरोज खान यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत मुमताजने काम केले आहे. राजेश खन्नांसोबत मुमताजने अनेक हिट चित्रपट दिले असले तरी त्यांना शम्मी कपूर आवडायचे. सुंदर मुमताजच्या मागे शम्मी कपूर अगदी वेडे होते. मुमताज तिच्या आग्रहावर टिकून राहिली नसती तर कदाचित ती आज कपूर घराण्याची सून झाली असती, कारण शम्मी कपूरला तिच्याशी लग्न करायचे होते.
शम्मी कपूरने मुमताजसमोर एक अट ठेवली होती जी मुमताजना कधीच मान्य नव्हती. लग्नानंतर अभिनय सोडावा लागेल असे शम्मी कपूरने मुमताजला सांगितले होते, ज्याला तिने नकार दिला. याच कारणामुळे त्यानंतर दोघेही लग्न करू शकले नाहीत. मात्र, दोघेही एकमेकांना खूप आवडत होते. मुमताजने शम्मी कपूर किंवा राजेश खन्ना यांच्याशी लग्न केले नाही, तर तिने एका व्यावसायिकाशी लग्न केले. मुमताजचे लग्न मयूर वाधवानीशी झाले. आणि आता त्यांचा सुखी संसार सुरू आहे. मुमताज आणि मयूर यांना तान्या माधवानी आणि नताशा माधवानी अशा दोन मुली आहेत. नताशाचे लग्न बॉलिवूड अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खानसोबत झाले.
Bollywood Actress Mumtaz and Shammi Kapur Relation
Entertainment