इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही नोकरी करत असताना एखाद्या खासगी कंपनीतील अधिकारी-कर्मचारी असो की, शासकीय सेवेतील असो, प्रत्येकालाच रोजच्या धावपळीत आणि कामाच्या धबडग्यातून वेळ काढून कुठेतरी बाहेर सहलीला किंवा पर्यटन स्थळी फिरायला जावे, असे वाटत असते. परंतु ते शक्य होत नाही. जगभरात कोरोनाची लाट कमी होऊ लागली आहे. कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे अनेक उद्योजकांना कर्मचाऱ्यांचा रोष पत्करावा लागला. परंतु काही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी या काळात देखील अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. आणि त्या कंपन्यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना त्या बदल्यात चांगला पगार किंवा बक्षिस दिले. अशाच एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चांगलंच खुश केले आहे. यूकेच्या योक रिक्रूटमेंट कंपनीने कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे.
सदर कंपनी ही आपल्या कर्मचाऱ्यांना रजा देऊन सहलीवर नेण्यासाठी तब्बल १ लाख पौंड म्हणजेच १ कोटींहून अधिक खर्च करत आहेत. याबाबत कंपनीचे सीसीओ पवन अरोरा म्हणाले की, २०२० हे वर्ष संपूर्ण उद्योगासाठी खूप कठीण गेले आहे. कंपनीच्या कर्मचार्यांनी अशा काळात जोखीम पत्करून काम केले, म्हणून आम्ही आमच्या कर्मचार्यांचे आभार मानू इच्छितो. यूकेच्या योक रिक्रूटमेंट कंपनीने त्यांच्या लिंक्डइन खात्यावर सुट्टीची घोषणा केली. कंपनीने सांगितले की, कर्मचार्यांनी कोरोनाच्या काळातही कठोर परिश्रम केले, ज्याने धन्यवाद म्हणून मोफत रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही जे काही करतो त्यात सर्वोत्तम देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचे उद्दिष्ट एक अशी संस्कृती विकसित करणे आणि त्यांचा विश्वास आहे.
कंपनीला कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करायचे आहे. या व्हेकेशन ट्रिपवर सुमारे एक कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने ही ऑफर केवळ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनाच नाही तर सर्व ५५ टीम सदस्यांना दिली असून ही सुट्टी एप्रिलमध्ये असेल. सदर कंपनी उत्तर पश्चिम आफ्रिकेतून स्पेनच्या कॅनरी बेटांवर सर्वांना घेऊन जात आहे. कर्मचाऱ्यांना ही रजा ४ दिवसांची असेल. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना मोफत सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.