पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात प्रत्येकालाच आपल्याकडे स्वतःचे वाहन असावे असे वाटते, त्यामुळे आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण कार घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे, त्यातच टाटा कंपनीच्या विविध प्रकारच्या कारला चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कंपनी मार्फत नवनवीन गाड्या बाजारात लाँच केल्या जात आहेत. टाटा मोटर्सने त्यांच्या प्रिमियम हॅचबॅक कार अल्ट्रोझची ‘डार्क’ आवृत्ती सादर केली आहे. दिल्लीत त्याची शोरूम किंमत 7.96 लाख रुपये आहे. देशांतर्गत बाजारात Altroz ला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे कंपनीने ही आवृत्ती लॉन्च केली आहे.
टाटा मोटर्सने सांगितले की, अल्ट्रोजच्या XT आणि XZ मॉडेल्समध्ये (डिझेल) या एडिशनचा समावेश केला आहे. टाटा मोटर्सच्या मते, या विस्ताराचा उद्देश ग्राहकांची संख्या वाढवणे आणि प्रीमियम स्टाइलिंग आणि लोकप्रिय वैशिष्ट्ये सादर करणे हा आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल्स डिव्हिजनचे उपाध्यक्ष राजन अंबा म्हणाले की, “देशातील 1.2 लाखाहून अधिक मालकांसह, Altroz ने प्रीमियम हॅचबॅक मार्केटमध्ये स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. हॅचबॅक सेगमेंटमध्ये या कारचा 20 टक्के वाटा आहे. टाटा अल्ट्रोजच्या च्या डार्क एडिशनची वैशिष्ट्ये म्हणजे याच्या डार्क एडिशनला ब्लॅक ग्रिल आणि लोअर बंपर देखील दिला जाईल. यामध्ये, फ्रंट फेंडरवर विशेष गडद बॅजिंग दिसेल. मात्र त्याच्या अलॉय व्हील्सच्या आकारात बदल होणार नाही. त्यावर काळ्या रंगाची ट्रीटमेंट दिली जाईल. आतील भागात लेदर सीट्स, डोअर पॅड्स आणि डॅशबोर्ड काळ्या रंगात ठेवला जाईल.
कारमध्ये ऑटो हेडलॅम्प, रेन सेन्सिंग वायपर्स, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, वेअरेबल की, अॅम्बियंट लाइटिंग, क्लायमेट कंट्रोल, फ्रंट, रिअर आर्मरेस्ट्स आणि रिअर एसी व्हेंट्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. टाटा अल्ट्रोझ डार्क एडिशनचे स्पेसिफिकेशन्स हे टाटा अल्ट्रोझ ALFA प्लॅटफॉर्मवर विकसित केले गेले आहे. या हॅचबॅक कारमध्ये कंपनीने प्रथमच ब्रेक स्वे कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम दिली आहे. Altroz ची पेट्रोल एडीशन 19.05 kmpl आणि डिझेल एडीशन 25.11 kmpl मायलेज देते. Tata Altroz ची डार्क एडिशनचे इंजिन हे पेट्रोल (NA आणि iTurbo) XZ प्लस टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. यात 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल. पेट्रोल इंजिन 86bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते, तर डिझेल इंजिन 90bhp पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करते.