नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी व सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हे दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालेले आहे. नाशिक महानगरपालिकेचा २०२३-२४ चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून यात सदर रस्त्याचा समावेश केल्यामुळे लवकरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून रस्ता स्मार्ट होणार आहे.
अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका रस्त्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेले होते. कॅनडा कॉर्नर ते महात्मा नगर हा रस्ता देखील काँक्रिटीकरण करण्यात आलेला होता. परंतु नाशिक महानगरपालिकेसमोरील कॅनडा कॉर्नर ते सीबीएस रस्ता मात्र डांबरी रस्ताच होता. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी जात असल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साठण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे या रस्त्याचा समावेश स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करून हा रस्ता स्मार्ट होणे गरजेचे असल्याचे आमदार देवयानी पर्यंत यांचे मत होते. तसेच जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्याचे ही काँक्रिटीकरण करणे गरजेचे होते.
या दोन्ही रस्त्यांचा समावेश स्मार्ट सिटी होण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी प्रयत्न केलेले होते. परंतु स्मार्ट सिटी योजनेचा कालावधी संपल्यामुळे सदर रस्त्यांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आमदार देवयानी पर्यंत यांनी आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलीस चौकी व सीबीएससी ते कॅनडा कॉर्नर या रस्त्याच्या समवेत महानगरपालिकेच्या बजेटमध्ये करण्यात येऊन सदर दोन्ही रस्ते स्मार्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात होणारी पाणी तुंबण्याचे प्रकार बंद होणार आहे.