India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निफाडच्या धुळवडमध्ये सोंगाऐवजी दिसले गोरिला, स्पायडरमॅन, साधू, माकड, अस्वल (बघा व्हिडिओ)

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड. निफाडला धुळवडी चे काही वेगळेच महत्त्व आहे. संध्याकाळी गावातून वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. घराघरातून लहान मोठ्या मुलांना वीराचा पोशाख घालून आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवले जाते. परंतु याआधी दिवसभर गावात डसन डुकरी धुमाकूळ घालत असतात. डसन डुकरी म्हणजे चित्रविचित्र पोशाख करून लहान मुलांना घाबरवणारी सोंगे होत.

धुळवडीच्या निमित्ताने चित्रविचित्र शक्यतो घाणेरडे फाटके तुटके कपडे घालून आणि भुतासारखा वेश करून काही हौशी तरुण गावभर फिरत असतात. ही डसनडूकरी बघणे आणि त्यांच्या मागे मागे गावभर भटकणे हे छोट्या छोट्या बालकांचे आवडते काम होऊन बसते. मोठी माणसे देखील हा प्रकार आनंदाने एन्जॉय करीत असतात. यंदा मात्र या डसन डुकरीने मॉडर्न अवतार घेतले असल्याचे निफाडकरांना बघायला मिळाले. गावची अनेक वर्षांची परंपरा जोपासण्यासाठी गावातीलच काही उत्साही तरुणांनी गलिच्छ ओंगळवाण्या सोंगांच्या ऐवजी गोरिला स्पायडरमॅन साधू माकड अस्वल वन्यप्राणी अशी विविध प्रकारची नाविन्यपूर्ण वेशभूषा करून निफाड शहरात एकच धमाल उडवून दिली. ग्रामस्थांनी देखील या नाविन्यपूर्ण कल्पनेला भरभरून दाद देत त्यांना बक्षीसी दिली. जुन्या परंपरांना नवे रूप देण्याचा हा निफाडकर युवकांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणता येईल.


Previous Post

नाशिक पोलिसांनी अवघ्या २ तासात लावला खुनाचा छडा… ३ आरोपी जेरबंद… असे घडले हत्याकांड

Next Post

नाशिक शहरातील हे दोन रस्ते होणार स्मार्ट; आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

नाशिक शहरातील हे दोन रस्ते होणार स्मार्ट; आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023

अमिताभ बच्चन यांना होतायत अतीशय तीव्र वेदना; त्यांनीच शेअर केला दुखापतीनंतरचा अनुभव

March 24, 2023

पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

March 24, 2023
प्रातिनिधीक छायाचित्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर

March 24, 2023
प्रातिनिधीक फोटो

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर

March 24, 2023

गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी; तब्बल ७० लाखांना गंडा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group