नवी दिल्ली – गुगलने सर्वात मोठे Google I/O 2021 या अँड्रॉइड १२ ओपरेटिंग सिस्टिमच्या व्हर्जनची घोषणा नुकतीच केली. व्हिव्हो, वन प्लस, ओप्पो आणि पिक्सेल यासारख्या जवळपास ११ मोबाइल ब्रँडमध्ये ऑपरिटिंग सिस्टिमचे बिटा व्हर्जन उपलब्ध असेल. गुगल पिक्सेल या फोनमध्येच काही फिचर्स उपलब्ध असून, या वर्षाअखेर तो येईल. नव्या अँड्रॉइड १२ व्हर्जनमध्ये वेगळा रंग, थिम, अॅप लोडिंगसाठी लागणारा वेळ, गोपनीय फिचर्स आणि आणखी अनेक फिचर्स आहेत. अँड्रॉइडमधील १२ फिचर्स कोणते आहेत हे आपण जाणून घेऊया.
अधिक जलद आणि बॅटरी वाचविणारा
अँड्रॉइड १२ हा अधिक क्षमतेच्या बॅटरीसह जलद गतीने काम करणारा असेल. गुगलने कोअर सिस्टिम सर्व्हिससाठी लागणारा सीपीयूचा वेळ २२ टक्क्यांनी कमी केलेला आहे. तसेच सिस्टिम सर्व्हरकडून लागणारा कोअर्स १५ टक्क्यांनी घटविला आहे.
प्रायव्हसी डॅशबोर्डमुळे अॅप्सवर नियंत्रण
यामध्ये नवा प्रायव्हसी डॅशबोर्ड असून, तुमच्या परवानगीने सिंगल व्ह्यू सेटिंग उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे कोणत्या अॅपमध्ये तुम्ही किती डाटा अॅक्सेस करतात हे सुद्धा कळू शकणार आहे. डॅशबोर्डवरून ही परवानगी सहज रद्द करण्याचीही सुविधा असेल.
कॅमेरा, मोयाक्रोफोन वापरासाठी इंडिकेटर
तुमच्या मोबाईलमधील एखादे अॅप मायक्रोफोन किंवा कॅमेरा वापरत असेल तर फोनमध्ये उजवीकडे सर्वात वर असलेल्या स्टेटस बारवर एक सूचक (इंडिकेटर) तुम्हाला सूचना करेल. जर तुम्हाला अॅपमधील सेन्सरचा अॅक्सेस काढून टाकायचा असेल तर क्विक सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ते करू शकतात.
स्मार्ट टीव्हीचे नियंत्रण
अँड्रॉइड फोनमध्ये गुगलने स्मार्ट टीव्हीचे रिमोटसुद्धा उपलब्ध करून दिले आहे.
वायफाय शेअरींगचा पर्याय
अँड्रॉइड १२ मध्ये तुम्ही फोनद्वारे वायफाय कनेक्शन शेअर करू शकतात. “Nearby” या बटनावर क्लिक करून QR code द्वारे शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मोठ्या फोनचा सहज वापर
मोठे फोन सिंगल हँड वापरासाठी अँड्रॉइड १२ मध्ये ‘One-handed’ मोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पिक्सल फोनमध्ये गुगल असिस्टंट
फोन कॉलसाठी, अॅप उघडण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी किंवा मोठे लेख वाचण्यासाठी गुगलने आता एक पॉवर बटन दिले आहे. ते अधिक काळ दाबून ठेवून वरील काम करू शकतात.
मोबाईलला नवा लूक मिळेल
अँड्रॉइड १२ ओपरेटिंग सिस्टिममधील UI design च्या मदतीने तुमच्या अँड्रॉइड फोनचा लूक पूर्णपणे बदलता येणार आहे. नव्या रंगांच्या पर्यायासह, अॅनिमेशन आणि इतर डिझाइनच्या सहाय्याने तुम्ही हे करू शकता.
लोकेशन अंदाजे कळू शकणार
approximate location permissions फिचरद्वारे तुम्ही अॅपशी शेअर केलेल्या लोकेशनबद्दलच्या माहितीवर आपले नियंत्रण असणार आहे. अचूनक लोकेशनऐवजी तुमचे लोकेशन अगदी मर्यादित स्वरूपात अॅपला कळू शकेल.
रंगांचे शेड आपोआप बदलतील
लाइट आणि डार्क मोडच्याही पुढे जाऊन गुगलने अँड्रॉइड फोनमध्ये वॉलपेपर वापरून अधिक खासगी केलेले आहे. पिक्सेल या फोनमध्ये कस्टम कलर पॅलेटद्वारे तुमचा फोन अधिक खासगी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीने वॉलपेपर निवडू शकता. सिस्टिम कोणता रंग चपखल बसू शकेल हे आपोआपा ठरवू शकणार आहे. हा पर्याय पूरक असून तुमचा फोन अधिक उठावदार दिसू शकेल.
अधिक माहिती दिसू शकणार
नोटिफिकेशन शेड खाली ओढल्यावर तुम्हाला गोलाकार कोपरे असलेले मोठे आयाताकृती आयकॉन दिसतील. नोटिफिकेशन एरियावर सेटिंग मेन्यूशिवाय तुम्ही अनेक कामे करू शकणार आहात. जर तुम्हाला सेटिंग पेजवर जायचे असेल तर कोणत्याही आयकॉन जास्त वेळ दाबून ठेवा.
ऑडिओ आणि भाषेसाठी पर्याय
अँड्रॉइड १२ च्या प्रायव्हेट कॉम्प्युट कोअर सिस्टिममध्ये लाईव्ह कॅप्शन, नाऊ प्लेईंग आणि स्मार्ट रिप्लाय यासारखे पर्याय दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही भाषा आणि ऑडिओ सेव्ह करून प्रायव्हसी जपू शकणार आहात.