शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार नाशिक मध्ये रविवारी रंगणार….

by Gautam Sancheti
जून 10, 2025 | 2:31 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 30

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) ‘एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक’ ही राष्ट्रीय दुचाकी रॅलीची दुसरी फेरी रंगणार असून इंदोर पाठोपाठ नाशिकमध्ये या स्पर्धेला स्पर्धकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. त्र्यंबकेश्वर नगरीपासून काही अंतरावर असलेल्या आंबोली ते हरसूल जवळच्या गावांमध्ये रविवारी सकाळी राष्ट्रीय दुचाकी रॅलीचा थरार रंगणार आहे.

शनिवारी सकाळ पासून शिखरे फार्म्सचे “श्रीहरी लॉन्स ” अंबोली येथे या रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या कागदपत्रांची छाननी तसेच गाड्यांची स्पर्धापूर्व वाहन तपासणी घेण्यात येणार आहे. नाशिकच्या एडब्लयू इव्हेट्‌सच्या वतिने यंदाच्या हंगामातील शेवटच्या दोन फेऱ्यांपैकी मायभूमीत आणखी एक राष्ट्रीय अजिंक्यपदाची फेरी आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. एफएमएससीआयच्या मान्यताने एम आर एफ मोग्रीप, टीव्हीएस अपाचे आरटीआर, गॉडस्पीड रेसिंग, महेंद्र बच्छाव ग्रुपच्या आंबोली वीकेंड होम्स, गोदा श्रद्धा फौंडेशन आणि शिखरे फार्म च्या श्रीहरी लॉन्स या प्रयोजकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या १० गटात रॅली रंगणार आहे. याही हंगामात महिलांचा स्वतंत्र गट सुरू करण्यात आला आहे. स्टार ऑफ महाराष्ट्र या राज्यभरातल्या खेळाडूंच्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दि. १४/०६ /२०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता सर्व स्पर्धकांना शिखरे फार्म्सचे “श्रीहरी लॉन्स ” अंबोली येथे ध्वज दाखवून मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व स्पर्धकांचा जत्था स्पर्धात्मक मार्गाची पाहणी करून “श्रीहरी लॉन्स ” येथे परत येईल .

रविवारी दि. ११ /०५ /२०२५ सकाळी ७ – ३१ वाजता “श्रीहरी लॉन्स ” येथून वाघेरा घाट मार्गे पहिली वीर नगर आडगाव देवळा फाटा च्या दिशेने रवाना होईल. प्रेक्षकांना विदेशी बनावटीच्या दुचाकी सोबतच स्कूटरच्या थरारक रायडिंगची लज्जत अनुभवायला मिळेल. सकाळी ८-३० वाजता वीर नगर आडगाव देवळा फाटा येथून रॅलीचा स्पर्धात्मक प्रारंभ होईल त्यामुळे प्रत्यक्ष रॅली मार्गावर जाऊन स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता प्रेक्षकांना रॅली सुरू होण्याच्या एक तास अगोदर स्पर्धा मार्गावर प्रवेश दिला जाईल. त्यानंतर सर्वांकरिता स्पर्धा मार्ग बंद करण्यात येईल व पूर्णत: निर्मनूष्य केलेल्या रस्त्यावर स्पर्धा घेतली जाईल. या मार्गावर जनावरे व खासगी अशी कोणत्याही स्वरूपाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असून त्याकरिता कार्यकर्त्यांची मोठी फळी तैनात करण्यात आली आहे.

स्पर्धेदरम्यान कोणाला तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास त्याकरिता तीन सुसज्ज रूग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहे, त्यातील एका रूग्णवाहिकेत ट्रॉमा केअर यूनिट सज्ज असेल. स्पर्धेच्या दळणवळणाच्या व संचालनाच्या दृष्टीने रेडियो संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे अशी माहिती रॅली चे क्लार्क ऑफ कोर्स COC तथा ए डब्लू इव्हेंट्स चे संस्थापक अमित वाघचौरे यांनी दिली आहे.

सदर स्पर्धेचा स्पर्धात्मक मार्ग त्र्यंबकेश्वर आणि हरसूल च्या दरम्यान वीरनगर – आडगाव देवळा फाटा – खरवळ – खरवळचा फणसपाडा फाटा – नांदगाव कोळी खरवळ फाटा – वरस विहीर – नांदगाव कोळी -हेदुलीपाडा दरम्यान असणार आहे. नंतर हे स्पर्धक हर्सूल “अंबोली विकेंड होम” येथे सर्विस साठी येतील, अशा पद्धतीने हा मार्ग स्पर्धक ३ वेळा पार पाडणार आहे.

यंदाच्या हंगामात राष्ट्रीय गटाच्या एकूण ९ गटांपैकी ५ गटांमध्ये शर्तीची चुरस जेते पद जिंकण्यासाठी बघण्यात येणार आहे. स्कूटर गटात स्पर्धकांचा मोठा दबदबा असून यंदाच्या हंगामाचा तृतीय क्रमांकाचा नाशिकचा शमीम खान -पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग आणि प्रथम स्थानावर असलेला पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग चा सय्यद असिफ अली कशा पद्धतीने टक्कर देतात हे बघणे रंजक ठरेल. महिला गटात टीव्हीएस रेसिंगच्या पी.एम.ऐश्वर्याच्या कौशल्याचे आपणास पुन्हा बघता येणार आहे. स्पर्धेत एकुणच पेट्रोनास टीव्हीएस विरुद्ध हिरो मोटरस्पोर्ट्स विरुद्ध व्ही एम मोटरस्पोर्ट्स या टीमच्या स्पर्धकांमधला सर्व गटातील मुकाबला रंगतदार ठरेल.

या स्पर्धेत नाशिककर स्पर्धाकांचा लक्षणीय सहभाग असेल, नाशिकच्या निलेश ठाकरे, हितेन ठक्कर, दर्शन चौरे, कौस्तुभ लोहार, रिषभ सिन्हा, शिवम सोनवणे यांचाही विविध गटांमध्ये प्रवेश घेतला आहे.

१७.१ किलेा मिटर स्पर्धात्मक अंतराच्या तीन फेर्‍या होतील.तर एकूण १५३ किमी आंतर असणार आहे . स्पर्धेचा संपूर्ण मार्ग तुटलेला डांबरी रास्ता असून त्यामुळे रॅलीची रंगत अधिकच वाढणार आहे. दुपारी ३ -३० वाजता दुसऱ्या फेरीचा समोराप होईल. त्यानंतर दुपारी ४-३० वाजता स्पर्धेचे प्राथमिक निकाल घोषित केले जातील. हरकती व अन्य बाबी तपासल्यानंतर ५ -०० वाजता अंतिम निकालाची घोषणा करण्यात येईल व त्वरित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण शिखरे फार्म्सचे “श्रीहरी लॉन्स ” अंबोली येथे करण्यात येईल.

या रॅलीचे मुख्य वाहन तपासनीस म्हणून माजी राष्ट्रीय विजेता तथा FMSCI चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी रवींद्र वाघचौरे आणि अंकित गज्जर मुख्य तांत्रिक अधिकारी हे काम पाहत आहे. त्याच प्रमाणे अनीश नायर स्पर्धक समन्वयक अधिकारी, सुधीर जोशी सुरक्षा अधिकारी, CRO – अनीश नायर , हेमंत देवरे, श्रीपाद व्यवहारे, आदित्य कंसारा, मनीष छाजेड , हेमंत झुरानी, अमोल जोशी, किरण वाघचौरे,मंदार भांडार, अरुण आपटे, सलील दातार,गणेश लोखंडे,आनंद बनसोडे,हेमंत देवरे,अमित बागुल,राजेंद्र वाघचौरे,अमर गायकवाड , मिलिंद जोशी,अंशुल म्हस्कर, मनोज जोशी , संदीप चाकणे,जयवंत हागोटे,उत्तम लिलके काम पाहत आहे.

त्याच प्रमाणे स्पर्धात्मक मार्गात येणाऱ्या वेलुंजे (वाळूभाऊ उघडे), नांदगाव कोळी (मनोहर गवळी), वरस विहीर (धोंडीराम डगळे), खरवळ(गोकुळ गारे व सुभाष मौळे), जयवंत हागोटे, उत्तम लिलके या गावांच्या सरपंचाचाही आणि सर्व नागरिकांचा यात मोलाचा वाट आहे .

त्याच प्रमाणे एफ एम एस सी आय कडून अश्विन पंडित , मनोज जोशी आणि प्रशांत गडकरी यांची नियुक्ती स्टिव्हर्ड म्हणून करण्यात आली आहे. छायाचित्र स्पर्धा वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रातून उत्कृष्ट छायाचित्रकारांना प्रथम रु. ३०००/- व प्रशस्ति पत्रक , द्वितीय रु.२०००/- व प्रशस्ती पत्रक व तृतीय रु.१०००/- व प्रशस्ती पत्रक असे बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत . या स्पर्धेत जास्तीत जास्त वृत्तपत्र छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुंभमेळ्यात शाही स्थानासाठी चक्क नवीन धरण बांधले जाणार?

Next Post

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार दुचाकी चोरीला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 1111

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार दुचाकी चोरीला

ताज्या बातम्या

ECI response 1024x768 1 e1741738630767

ईव्हीएम छेडछाड अशक्य; राज्यातील या १० विधानसभा मतदार संघात केली तपासणी

ऑगस्ट 1, 2025
सुपर स्पेशालिटी प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण 2 1024x576 1

आता प्राण्यांच्या सेवेसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिका….मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

ऑगस्ट 1, 2025
railway 1

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी…इतक्या कोटींचा निधी मिळाला

ऑगस्ट 1, 2025
CM

कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये…मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय मंत्र्याना केली हस्तक्षेपाची विनंती

ऑगस्ट 1, 2025
IMG 20250731 WA0289

नाशिकला ‘मराठी बालनाट्य दिवस’ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

ऑगस्ट 1, 2025
Manikrao Kokate 2 1024x512 1

अखेर माणिकराव ठाकरे यांच्या खाते बदलले…या मंत्र्याकडे कृषीमंत्रीपदाची जबाबदारी

ऑगस्ट 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011