नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर इंडिका विस्टा कारने अचानक पेट घेतल्यामुळे ही गाडी जळून खाक झाली. पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या मालकीची ही गाडी होती. या गाडीत घडवजे एकटेच होते. त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच ते गाडीतून बाहेर पडले. वायरिंगमध्ये शॅार्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. एमएच १२ एफएन ०७४५ हा कारचा नंबर असून ही आग सकाळी ११ वाजता लागली.