मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

६,६,६! धावांचा पाऊस पाडत शुभमन गिलचे द्विशतक; असा भीम पराक्रम करणारा जगातील सर्वात युवा फलंदाज (व्हिडिओ)

by Gautam Sancheti
जानेवारी 18, 2023 | 6:17 pm
in मुख्य बातमी
0
Shubman Gill e1674046029646

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आज धावांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. उल्लेखनिय म्हणजे, भारताचा सलामीवीर शुभमन गिलने तडाखेबंद द्विशतक झळकावले आहे. सलग तीन षटकार मारुन गिलने द्विशतक पूर्ण केले. द्विशत करणारा तो जगातील सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, भारताने ५० षटकात ३४९ धावा केल्या असून न्यूझीलंडला ३५० धावांचे लक्ष्य दिले आहे.

टीम इंडियाने ५० षटकांत आठ विकेट गमावत ३४९ धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक २०८ धावांची खेळी खेळली. तो नाबाद राहिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. शुभमनशिवाय रोहित शर्माने ३४, सूर्यकुमार यादवने ३१, हार्दिक पांड्याने २८ आणि वॉशिंग्टन सुंदरने १२ धावा केल्या. विराट कोहली ८ आणि इशान किशन ५ धावा करून बाद झाले. शुभमन गिलने १९व्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारून त्याने २०० धावांचा टप्पा गाठला. वनडेत द्विशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज आहे.

2⃣0⃣0⃣ !? ?

???????? ????!??

One mighty knock! ? ?

The moment, the reactions & the celebrations ? ?

Follow the match ? https://t.co/IQq47h2W47 #TeamIndia | #INDvNZ | @ShubmanGill pic.twitter.com/sKAeLqd8QV

— BCCI (@BCCI) January 18, 2023

भारत आणि बांगलादेश यांच्यात नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत (IND vs BAN) सलामीवीर इशान किशनने केवळ 131 चेंडूत 210 धावांची शानदार खेळी केली. ही झंझावाती खेळी खेळण्यासोबतच तो भारतासाठी द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला. पण, शुभमन गिलने त्याचा विक्रम मोडला आणि हा विक्रम आपल्या नावावर केला. शुभमन गिलने केवळ २३ वर्षे १३२ दिवसांच्या वयात एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. तर इशान किशनने वयाच्या २४ वर्षे १४५ दिवसांत हा पराक्रम केला.

वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू
२३ वर्षे १३२ दिवस – शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, वर्ष २०२३
२४ वर्षे १४५ दिवस – इशान किशन विरुद्ध बांगलादेश, वर्ष २०२२
२६ वर्षे १८६ दिवस – रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वर्ष २०१३
२७ वर्षे १९७ दिवस – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, वर्ष २०१४
२८ वर्षे १०१ दिवस – फखर जमान विरुद्ध झिम्बाब्वे, वर्ष २०१८

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने १३९.६ च्या स्ट्राइक रेटने फक्त १४९ चेंडूत २०८ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १९ चौकार आणि ९ गगनचुंबी षटकार दिसले. गिलच्या या झंझावाती खेळीमुळे भारतीय संघाला ५० षटकांत ८ गडी गमावून ३४९ धावांची मोठी मजल मारता आली.

A SIX to bring up his Double Hundred ??

Watch that moment here, ICYMI ??#INDvNZ #TeamIndia @ShubmanGill pic.twitter.com/8qCReIQ3lc

— BCCI (@BCCI) January 18, 2023

भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची वनडे मालिका ३-० ने जिंकली आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड संघासाठी भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नसेल. किवी संघ ३४ वर्षांपासून भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकलेला नाही, अशा परिस्थितीत टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघ इतिहासाची पाने उलटून ३४ वर्षांचा दुष्काळ संपवू इच्छित आहे.

दोन्ही संघ असे
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, फिन ऍलन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, हेन्री शिपले, ब्लेअर टिकनर.

200 reasons to cheer! ? ?

Shubman Gill joins a very special list ? ?

Follow the match ? https://t.co/IQq47h2W47 #TeamIndia | #INDvNZ | @ShubmanGill pic.twitter.com/xsZ5viz8fk

— BCCI (@BCCI) January 18, 2023

Cricket Ind Vs NZ 1 ODI Shubman Gill Double Century

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातपूरला पुन्हा एकदा टवाळखोरांचा उपद्रव; रात्री ८ ते १० वाहनांच्या फोडल्या काचा

Next Post

नाशिक – वणी मार्गावर बर्निंग कारचा थरार (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
20230118 175959

नाशिक - वणी मार्गावर बर्निंग कारचा थरार (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011