इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्माचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. तिच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली आहे. तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचे आहे. अदानेच सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
अभिनेत्री अदाने सांगितले की ती पूर्णपणे बरी आहे. तिनी ट्विट केले की काळजी करण्यासारखे काही नाही. ती आणि तिची संपूर्ण टीम ठीक आहे. आमच्या अपघाताची बातमी व्हायरल झाल्यानंतर मला अनेक लोकांकडून मेसेज येत आहेत. आमची संपूर्ण टीम आणि आम्ही पूर्णपणे निरोगी आहोत. कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार.
सध्या द केरळ स्टोरीवरून वाद सुरू आहे. अदा शर्मासह चित्रपटाशी संबंधित लोकांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. लव्ह जिहाद, धर्मांतर यासारखे मुद्दे चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. चित्रपटात तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यांचा धर्म बदलून त्यांना ISIS मध्ये भरती करून दहशतवादी बनवले जाते.
केरळमधून बेपत्ता झालेल्या ३२ हजार मुलींचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी सीरियात पाठवण्यात आल्याचा दावा या चित्रपटाच्या माध्यमातून केला जात आहे. या चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी तुम्हाला हादरवून सोडतील. या चित्रपटाला राजकीय पक्ष आणि गटांच्या एका वर्गाकडून विरोध होत आहे. हा चित्रपट वस्तुस्थितीवर आधारित नसून मुस्लीम समाजाविरुद्ध द्वेषाला चालना देतो, असा त्यांचा दावा आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे.
https://twitter.com/adah_sharma/status/1657757721335336961?s=20
The Kerala Story Actress Adah Sharma Accident