मुंबई – राज्यभरातील दुकाने उघडण्याबाबत व्यापारी संघटनांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने सर्व व्यापारी संघटनांची पुन्हा बैठक आज शनिवार दि. १० एप्रिल रोजी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी संपन्न झाली. या ऑनलाईन बैठकीत वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी,प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांच्यासह राज्यातील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.
कोरोनामुळे पहिले लॉक डाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू सगळे सुरू झाले. मग पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रेक द चेन करण्यात आले, कड़क निर्बंध लावण्यात आले. आणि आता पुन्हा लॉकडाउन ? पुढे काय ? या प्रश्नावर ही बैठक होती.
बैठकीत हे झाले निर्णय
– संपूर्ण लॅाकडाऊन असेल तर सरकारच्या निर्णयाबरोबर, त्यावर विचार करु
– पण, संपूर्ण लॅाकडाऊन नसेल तर सोमवारी राज्यभरातील सकाळी १० वाजता दुकाने उघडणार
………….
संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होणार :
सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम ; – संतोष मंडलेचा
छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची मागणी
उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होण्याचा निर्णय झाला असून संपूर्ण लॉकडाऊन न झाल्यास ८ तारखेला झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम तसेच छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची मागणी करण्यात आली आज व्यापारी संघटनांच्या बैठकीत झाल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रिकल्चर तर्फे आज १० एप्रिल २०२१ रोजी दुपारी ६ . ३० वाजता ” लॉकडाऊन व ब्रेक द चेन, पुढे काय ? ” या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व व्यापारी सभासद यांची झूम ॲपवर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली.
बैठकीत महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून गेल्या ६, ८ व १० असे ३ दिवस सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेत आहोत तसेच संपर्कात आहोत तसेच सरकारशी संपर्क करून आहोत. सर्वांच्या भुमीका मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. तरी सर्वांनी आजच्या बैठकीत आपल्या संघटनेची भूमिका मांडावी असे सांगितले.
बैठकीत हे झाले सहभागी
बैठकीत विश्वस्त श्री. कैलास खंडलेवाल, विश्वस्त श्री. विलास शिरोरे, उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा, नाशिक शाखा चेअरमन श्री. संजय दादलीका, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. विनोद कलंत्री, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री. संजय शेटे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, पुणे व्यापारी महासंघाचे श्री. फतेचंद राका, चेंबर ऑफ मराठवाडा, इंडस्ट्रीज अँण्ड अग्रिकल्चरचे प्रफुल्ल मालाणी , फामचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. राजेश शहा, गडचिरोली व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. रवी चन्नावार , गोंदियाचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बग्गा, पूना मर्चन्टस चेंबर्सचे अध्यक्ष श्री. पोपटलाल ओस्तवाल, चंद्रपूर चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन संघवी, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. अश्विन मेदांडिया, गोंदिया जिल्हा व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रामजीवन परमार, नाशिक घाऊक व्यापारी किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, हार्डवेअर अँन्ड पेन्ट्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार लोढा, नाशिक मोटार मर्चन्ट असोसिएशनचे श्री. सुरेश चावला, श्री. हर्षवर्धन संघवी, सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे नितीन थायशेटे , श्री. सुरेश पाटील, सांगली, संगमनेर असोसिएशनचे श्री. ओंकारनाथ भंडारी, टिम्बर फेडरेशन, जळगाव व्यापारी महासंघाचे दिलीप गांधी, चंद्रपूर व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सदानंद खत्री, स्टील चेंबर, सिमेंट स्टाॅकिस्ट असोसिएशन, तुर्भे व्यापारी असोसिएशन, पालघर वसई तारापूर असोसिएशन, कॅटचे श्री राजेंद्र बांठिया, हिंगोली व्यापारी महासंघाचे गजानन घुगे, दि. सराफ असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गिरीश नवसे, प्लायवुड असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हसमुखभाई पटेल, कॉम्पुटर असोसिएशनचे अध्यक्ष शरद मिश्रा, लातूर व्यापारी महासंघाचे प्रदीप सोलंकी, सिंधुदुर्ग प्रसाद पारकर, मनमाड व्यापारी महासंघाचे राजू पारिक, अंबरनाथ असोसिएशनच्या पदाधिकारीसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी सरकारच्या लॉकडाऊन व ब्रेक द चेन, पुढे काय? या विषयावर सरकारच्या निर्णयावर मत मांडले . फॅटचे शेवटी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी आभार मानले. बैठकीस मालेगावचे श्री. ओम गगराणी, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष श्री. करुणाकर शेट्टी, श्री. समीर दुधगावकर, श्री. अजित सुराणा,सौ. सोनल दगडे, महाराष्ट्र चेंबर प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे, सचिव विनी दत्ता, सहायक सचिव अविनाश पाठक आदीसह २०० व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.