अमृता फडणवीस यांच्या पोस्टची जोरदार चर्चा

नागपूर – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसाचा एक फोटो त्यांनी ट्विटरद्वारे पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अमृता यांनी लिहिले आहे की, सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है. हे लिहिण्याचा त्यांचा रोख नक्की कुठे आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. यापूर्वीही अमृता यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टचा रोख ठाकरे सरकारकडे आहे का, अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे.