मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला नवे नाव आणि निशाणी आज दिली आहे. त्यानुसार ठाकरे गटाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे आहे तर निशाणी पेटती मशाल देण्यात आली आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रीया आली आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी नव्या निशाणीचे स्वागत करणारा हा व्हिडिओ आहे. हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे अशा आशयाचे गाणे असलेला हा व्हिडिओ आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे एकूण चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ यांचा समावेश होता. आता आयोगाने ठाकरे गटाला पेटती मशाल ही निशाणी दिली आहे. त्याचे ठाकरे दटाने मनापासून स्वागत केले आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/1579490926913032193?s=20&t=mF7yYWAMficsMEVVMwGmgQ
Thackeray Group Reaction After New Symbol
Politics Shivsena Uddhav Thackeray