मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मधील कोणत्याही कलाकाराच्या संदर्भात लग्नाची चर्चा सुरू झाली की सर्वांनाच उत्सुकता लागते. त्यातच अनेक अभिनेत्री आणि खेळाडूंचे यापूर्वी प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली, असे दिसून येते. सध्या ही अशाच एका जोडप्याची चर्चा सुरू आहे अभिनेत्री किम शर्मा आणि खेळाडू लिएंडर पेस यांच्या अफेअरची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या निमित्ताने गोव्यातील त्यांची छायाचित्रे समोर आली तेव्हा त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या. या फोटोंमधील त्यांच्यातील जवळीक पाहून ते एकमेकांना डेट करत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो समोर आले असून यात या जोडप्याने खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले. आता तर लिएंडर पेस आणि किम शर्मा लवकरच कोर्ट मॅरेज करू शकतात.
विशेष म्हणजे अलीकडच्या काळात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. किम शर्मा आणि लिएंडर पेसच्या पालकांनी त्यांना आशीर्वाद दिल्याचे सांगितले जात आहे. लिएंडर पेसच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली की, ‘लिएंडरचे आई-वडील आणि किमचे आई-वडील नुकतेच मुंबईत आले होते. किमच्या वांद्रे येथील घरी कोर्ट मॅरेजच्या नियोजनावर त्यांनी चर्चा केली.
याबाबत किम शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याआधीही किम आणि लिएंडरच्या आई-वडिलांची भेट झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे जोडपे लिएंडरच्या पालकांना भेटण्यासाठी कोलकाता येथे गेले होते, तिथे किमचे पालकही पोहोचले होते.
किम शर्मा हिने 2000 साली यशराज बॅनरच्या ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्याने ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘मनी है तो हनी है’सह इतर चित्रपट केले आहेत. सध्या किम बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.
बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि खेळाडू यांच्यात वेगळेच रिलेशनशिप असते असे म्हटले जाते, अनेक खेळाडूंनी चित्रपटसृष्टी मधील अभिनेत्रीशी मैत्री करत असतानाच कालांतराने लग्न देखील केले आहे, अशाच एका रिलेशनशिप विषयी सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्यामध्ये अफेअर आहे की आणखी काही असे बॉलीवूड सह क्रीडाक्षेत्रात बोलले जात आहे.
‘मोहब्बतें’ सिनेमा फेम अभिनेत्री किम शर्मा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी आणि फॉलोअर्ससाठी सुंदर फोटो शेअर करत असते. छायाचित्रांच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्याची झलक देखील दाखवते. सध्या किम शर्मा सुट्टीसाठी परदेशात गेली आहे. विशेष म्हणजे ती सध्या टेनिस स्टार लिएंडर पेसही त्याच्यासोबत आहे. या दोघांच्या रिलेशनशिप तथा लिंकअपच्या बातम्या बर्याच दिवसांपासून येत आहेत, मात्र किम आणि लिएंडरने यावर अद्याप उघडपणे काहीही सांगितलेले नव्हते. मात्र दोघे काही बोलत नसतील पण त्यांची ही छायाचित्रे खूप काही सांगून जात होते.
विशेष म्हणजे अभिनेत्री किम आणि लिएंडर अमेरिकेतील डिस्नेच्या मॅजिक किंग पार्कमध्ये काही महिन्यांपूर्वी हँग आउट करताना दिसले. दोघांनीही हातात हात घालून फोटो काढले. तर दुसर्या छायाचित्रात, किम आणि लिएंडर एकच आइस्क्रीम खात आहेत आणि लिएंडर सेल्फी काढत आहे. दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम एन्जॉय करत आहेत. किमने फोटोसोबत एक इमोजी देखील पोस्ट केला आहे. किमच्या फोटोंवर चाहत्यांच्या खूप कमेंट्स येत आहेत. यात एका यूजरने लिहिले – ‘तुम्ही दोघे सर्वात क्यूट आहात.’ तर आणखी एक चाहता म्हणतो, ‘तुम्ही माझे खूप आवडते आहात.’ एकाने कमेंट केली, ‘तुम्ही दोघे अप्रतिम दिसता, एन्जॉय करा.’
विशेष म्हणजे गेल्या वर्षी किम आणि लिएंडर गोव्यातील एका रेस्टॉरंट-बारमध्ये दिसले होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनची केली जाऊ लागली. आता छायाचित्रांमध्ये त्यांनी एकमेकांना मिठी मारताना पोझ दिली. किम शर्मा ही सुमारे ११ वर्षापासून चित्रपट क्षेत्रापासून दूर असून ती २०१० मध्ये आलेल्या तेलगू चित्रपट ‘यागम ‘ मध्ये पडद्यावर दिसली होती.