इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही क्षेत्रात उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवायचे असेल तर खूप नियोजनाने विचार करावा लागते. अर्थात हा उद्योग व्यवसाय चालेल का? त्याची प्रगती होईल का? नेमके याचे ग्राहक कोण? बाजारपेठ कोणती? या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागतो. तरच तो उद्योग व्यवसाय यशस्वी होतो, असे म्हणतात. अर्थात नेमक्या कोणत्या उद्योग व्यवसायात पडावे , याचा सल्ला देणारे तज्ज्ञ तज्ञांचे मार्गदर्शक घेणे गरजेचे ठरते. परंतु एखाद्या मोठ्या उद्योजकाला या क्षेत्रात आपण पाऊल ठेवा ! असे सांगण्याचे धाडस कोण करत असेल. हे सांगणे कठीण आहे. परंतु खुद्द प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सुमारे सहा वर्षापूर्वी आपल्याला एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे कोणी सुचविले याची माहिती दिली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. कोण होते ती व्यक्ती?
अंबानी यांच्या रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले आणि एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसह अन्य कंपन्यांचे चांगलीच धावपळ उडाली. कारण रिलायन्स जिओने अल्पावधीतच लाखो युझर्स मिळवले. याचा मोठा परिणाम टेलिकॉम क्षेत्रात क्रांतीकारक बदलांना सुरुवात झाली होती, याचा फटका अन्य कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसला. मात्र, जिओची आयडिया नेमकी कुणी दिली, याबाबत खुद्द मुकेश अंबानी यांनीच सन २०१८ मध्ये मुकेश अंबानी लंडन येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी तेथे जिओची जन्मकथा तिथे सांगितली कार्यक्रमात माहिती दिली.
वास्तविक रिलायन्स जिओला टेलिकॉम क्षेत्रात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कंपनीचे वर्चस्व अजूनही बाजारावर कायम आहे. सप्टेंबर २०१६ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यानंतर भारताचे टेलिकॉम मार्केट पूर्णता बदलून गेले. एवढी क्रांती करणाऱ्या जिओची आयडिया कोणाच्या मनातून आली असेल, असा प्रश्न कोणाला नक्की पडू शकतो ? जिओची कल्पना त्यांना मुलगी ईशाने दिली होती. सन २०११ मध्ये ईशा अंबानीही येल विद्यापीठात शिक्षण घेत होती. सुट्यांच्या काळात ती घरी आली होती. तिला अभ्यासक्रमाविषयीचे काही अभ्यास करायचा होता. त्यावेळी त्यांनी येथील इंटरनेट अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने कॉलिंग सेवेचे दिवस संपले असून आता इंटरनेटचा जमाना असल्याचे म्हटले होते. कारण सन २०११ मध्ये इंटरनेट अत्यंत कमी गतीने सेवा देत होते. तसेच महागडे असल्याने इंटरनेट हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. येथूनच जिओच्या जन्माचे नियोजन सुरु झाले.
त्यानंतर सन २०१६ मध्ये बाजारात दाखल झालेल्या जिओने बाजारात धमाल केली. अवघ्या सहा वर्षांत टेलिकॉम बाजार बदलून टाकला. कंपनीने त्यांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि एसएमएस सेवा दिली आणि डेटावर लक्ष्य केंद्रित केले. इतकेच नव्हे, तर आता जिओ लवकरच 5G सेवाही सुरू करत आहे. खरे तर जियो बाजारात येण्यापूर्वी केवळ कॉलिंग सुविधेवर कंपन्या जोर देत होत्या. जिओमुळे कंपन्या डेटावर भर देऊ लागल्या. टेलिकॉम मार्केटमध्ये धमाका करुन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या कंपनीची जादू अजूनही बाजारावर कायम आहे. ५ सप्टेंबर २०१६ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम बाजारात पाऊल ठेवले होते. त्यानंतर भारताचं टेलिकॉम मार्केट पूर्णता बदलून गेले. कारण भारतात जिओ येण्यापूर्वीही सोशल मीडियाचा वापर होत होता. परंतु, जिओने बाजारात जोरदार धडक दिली.
कॉलिंगऐवजी कंपनीने डेटा प्लॅनवर लक्ष्य केंद्रित केले. डेटा प्लॅन अगदी स्वस्त केला. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करणे नागरिकांना सहज सोपे झाले. बाजारात कंपनीने चांगला दबदबा तयार केला. पण इतर कंपन्यांच्या दबावामुळे कंपनीला फ्री कॉलिंग सेवा बंद करावी लागली. त्यात भारतीय ग्राहकांचे मोठे नुकसान झाले होते. एकंदरीत टेलिकॉम क्षेत्रात जिओचा धबधबा अद्यापही कायम आहे यामागे अनेकांचे योगदान असले तरी संकल्पना कोणाची आहे हे आता आपल्याला निश्चितच कळले असेल.
Telecom Reliance Jio Birth Story Mukesh ambani
Industry