इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात विजेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे, वीज तथा ऊर्जा निर्मितीसाठी पानचक्की, पवनचक्की, सौरउर्जा, औष्णिक उर्जा, अणुऊर्जा अशा अनेक प्रकारे वीज निर्माण करण्यात येते, परंतु त्यामध्ये पवन ऊर्जा ही सर्वात स्वस्त प्रमाणात निर्माण होणारी ऊर्जा आहे, असे म्हटले जाते. भविष्यात पवन ऊर्जेचा शोध आज सर्वाधिक युक्त ठरणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात नवनवीन शोध लागत आहेत. अशाच प्रकारे पवन ऊर्जेचा वापर करीत टर्बाईन बनविण्यात आल्या असून त्या संदर्भातील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.
खरे म्हणजे भारतातील काही राज्यात आजही अनेक नागरिक अंधारात राहतात. भारतीय लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी वीज हे अजूनही स्वप्नच आहे. या वीज संकटावर मात करण्यासाठी एक अप्रतिम शोध लावला गेला आहे. ज्याच्या मदतीने अगदी कमी खर्चात स्वतः संपूर्ण घरासाठी वीज निर्माण करू शकता. वास्तविक आपण जेव्हा एखाकी पवनचक्की पाहातो, तेव्हा आपल्याला उंच टॉवर आणि त्यावर लावलेले तीन मोठे ब्लेड किंवा पंख्यांचे पाते दिसून येतात. ते वाऱ्याच्या वेगाच्या सहाय्याने ते फिरत असतात. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने हे विंड टर्बाईन बनवले गेले असून ते आपल्याला घराच्या छतावर किंवा ऑफीसच्या छतावरही सहज लावता येतील. त्यामुळे मोफत वीज प्राप्त होईल आणि वीजेच्या बिलापासून कायमस्वरुपी सुटका होईल. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी अशाच एका विंड टर्बाइनचा व्हिडिओ शेअर केला आहे. याचं नाव आहे तुलीप विंड टर्बाईन आणि याचं वैशिट्य असं की ती अतिशय कमीत कमी जागेत उभारली जाऊ शकते. यासाठी मोठ्या टॉवरची किंवा जास्त जागा (जमिन ) याची गरज नाही.
केरळमधील अरुण आणि अनूप जॉर्ज या दोन भावांनी वीज संकटावर मात करण्यासाठी एक लहान पवनचक्की तयार केली असून त्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये असून ती आयफोनच्या किमतीपेक्षा स्वस्त म्हणता येईल. यामुळे संपूर्ण घराला आयुष्यभर वीज मिळू शकते. सिलिंग फॅनच्या आकाराची ही पवनचक्की दररोज ३ ते ५ किलो व्हॉट वीज निर्माण करू शकते. या उलट जेव्हा एक लहान विंड टर्बाइन १ किलोवॅट ऊर्जा निर्माण करते, तेव्हा त्याची किंमत सुमारे ३ ते ७ लाख रुपये असते. मात्र ही विंड टर्बाइन बाजारात आणण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे अनेक भारतीय ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय असू शकतो. सामान्यत: पवन शेतात वापरल्या जाणार्या, टर्बाइन ही तीन-ब्लेड मशीन असतात, जी संगणक-चालित मोटर्सद्वारे चालविली जातात.
वारा हे पंखे फिरवतो, ज्यांचा वेग सरासरी १० ते २२आवर्तन प्रति मिनिट असतो. पवन टर्बाइनमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याची पद्धत वायु गति संबंधित आहे. सध्या स्टील आणि काचेच्या ऐवजी, कार्बन आणि फायबरचा वापर आता हलका आणि लांब पंखे बनवण्यासाठी केला जात आहे कारण ते अधिक लवचिक आणि क्रॅक होण्याची शक्यता कमी आहेत. पवन उर्जा तज्ज्ञ सध्या अधिक कार्यक्षमते साठी लहान टर्बाइनवर देखील काम करत आहेत. तर दुसरीकडे पुणे येथील सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही या क्षेत्रातील एक प्रमुख भारतीय कंपनी असून एकूण १४ मेगावॅट क्षमतेच्या ६ खंडांमध्ये पवनचक्क्या बसवल्या आहेत. कमी वाऱ्याच्या क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी याने नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल नुसार, स्थापित जागतिक पवन ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत चीन, अमेरिका आणि जर्मनीनंतर चौथ्या क्रमांकावर आहे.
तुलिप विंड टर्बाइनच्या दोन पंख्यात हवा आली की, त्याच्या मदतीने टर्बाइनची इतर पंखेही फिरू लागतात. अशावेळी कमीत कमी किमतीत आणि खर्चात ग्रीन एनर्जीची निर्मिती होते. कमी हवेतही वीज निर्मितीची क्षमता या टर्बाइनची आहे. विशेष म्हणजे विंड टर्बाइनचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी याबाबत प्रतिक्रिया ट्विटरवर शेअर केली आहे. पारंपारिक टर्बाइनसाठी इतकी जमीन आणि उंचीवर ते बसवणे आणखी किती काळ चालणार? त्याऐवजी आता ऊर्जेच्या निर्मितीसाठी अशा नव्या पर्यायांचे आपण स्वागत केले पाहिजे, भारतासाठी तुलिप टर्बाइन एक आदर्श असल्याचेही आनंद महिंद्रा म्हणाले.
https://twitter.com/anandmahindra/status/1583383766235766785?s=20&t=nbe4ixywUtVevTgbdGPkrQ
Technology Free Electricity Home Office Video
Wind Turbine Anand Mahindra Tweet