इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंदूर येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना गमावल्याने भारताला आणखी एक झटका बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अर्थात डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने मात्र प्रवेश मिळवला आहे.
२०२१-२३ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने २०१९ साली सुरू केलेल्या कसोटी सामने असणाऱ्या लीग स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती आहे. ४ ऑगस्ट २०२१ रोजी इंग्लंड आणि भारत यांच्या कसोटी सामन्याद्वारे या स्पर्धेस सुरुवात झाली व जून २०२३ मध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. या आवृत्तीमध्ये केवळ २०२१-२२ ॲशेस मालिका आणि इंग्लंड आणि भारत कसोटी मालिका या दोनच मालिका अश्या आहेत ज्यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जातील. बाकी मालिका दोन किंवा तीन सामन्यांच्या आहेत. यापूर्वी हे अजिंक्यपद न्युझीलंडने मिळविले होते. आता या दुसऱ्या आवृत्तीसाठी भारतसह इतरही देश स्पर्धेत आहेत. त्या अनुषंगाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारतासाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
अशी आहे संधी
भारतीय संघ ही कसोटी मालिका २-१, ३-१ किंवा ४-० ने गमावतो यावर अवलंबून आहे. भारतीय संघाने एकतर्फी मालिका गमावली नाही म्हणजे जवळून पराभव पत्करावा लागला. तर त्याला डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडने जिंकली, जर न्यूझीलंडने ही मालिका २-० ने जिंकली तर भारतासाठी ते अधिक चांगले होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव व्हावा, अशी प्रार्थना भारताला करावी लागणार आहे.
#WTC23 Final bound ?
Congratulations Australia. See you in June! ? pic.twitter.com/H2YdaWPzYV
— ICC (@ICC) March 3, 2023
Team India ICC WTC Final Match Australia