India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रिलायन्सची मोठी घोषणा! आंध्र प्रदेशात मोठी गुंतवणूक; ५० हजार नवीन रोजगाराच्या संधी

• रिलायन्स 10 गिगा वॅट सौर शक्तीमध्ये गुंतवणूक करेल

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स आंध्र प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणार आहे आणि सोबतच देशभरात आंध्र प्रदेशाची उत्पादने राज्य, कृषी आधारित उत्पादने, रिलायन्स रिटेल पोहोचविण्यास मदत करेल आणि आंध्र प्रदेशाची इतर उत्पादने जास्तीत जास्त प्रमाणात खरेदी देखील करणार आहे. तसेच, रिलायन्स 10 GW सौर उर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणार आहे ही घोषणा ‘आंध्र प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023’ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री मुकेश अंबानी यांनी केली.

आंध्राचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत मुकेश अंबानी, रिटेल क्षेत्रातील क्रांतीचा संदर्भ देताना म्हणाले की, रिलायन्स रिटेलने आंध्र प्रदेशातील 6 हजार गावात 1 लाखाहून अधिक किराणा किराणा व्यापाऱ्यांशी भागीदारी केली आहे. अगदी डिजिटल युगातही, लहान व्यापाऱ्यांची भरभराट होऊ शकते हे सुनिश्चित करण्यासाठी रिलायन्स आवश्यक अशा उपाय योजनांनी सुसज्ज आहेत. रिलायन्स रिटेलने आंध्र प्रदेशात २०,००० हून अधिक थेट रोजगार आणि मोठ्या संख्येने अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे.

रिलायन्स जिओबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, आंध्र प्रदेशसह भारतामध्ये 2023 च्या अखेरीस जिओ ट्रू G जीची रोलआउट पूर्ण होईल. 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करून, जिओने राज्यातील सर्वात मोठे आणि सर्वोत्कृष्ट डिजिटल नेटवर्क फूटप्रिंट तयार केले आहे, ज्यात राज्यातील 98% लोकसंख्या समाविष्ट आहे. जिओ ट्रू 5 जी अर्थव्यवस्थेला नवीन वेग देईल आणि मोठ्या प्रमाणात व्यापार आणि रोजगाराच्या संधी देखील निर्माण करेल.

आंध्र प्रदेशच्या प्रचंड आर्थिक क्षमतेचे कौतुक करताना मुकेश अंबानी म्हणाले की, राज्याच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास ठेवणार्‍या पहिल्या काही भारतीय कंपन्यांपैकी एक रिलायन्स आहे. राज्यात आम्ही आमच्या केजी-डी 6 बेसिन आणि त्याच्या पाइपलाइनवर 1,50,000 कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. लवकरच केजी-डी 6 बेसिन भारताच्या एकूण गॅस उत्पादनात सुमारे 30% योगदान देईल.

आंध्र प्रदेशाचे महत्व अधोरेखित करताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की येथे मोठं मोठे उद्योग आणी उद्योगपती रांगेत आहेत विशेषत: फार्मा आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि आंद्राच्या वरच्या बाजूस भव्य सागरी सीमा आहे जी एक महाकाय ब्लु इकॉनॉमि मद्धे रूपांतरित होऊ शकते. नवीन भारताच्या विकास गाथेमध्ये आंध्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Reliance Andhra Pradesh Big Investment 50 Thousand Employment


Previous Post

कसोटीतील पराभवाने टीम इंडियाला बसला हा फटका; ऑस्ट्रेलियाची मात्र एण्ट्री

Next Post

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत शिथिलता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Next Post

शासनाच्या सरळसेवा भरतीसाठी वयोमर्यादेत शिथिलता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group