इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचे आयुष्य घडविणारी व्यक्ती अशी ओळख कालौघात मिटत चालली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अध्यापनाच्या आदर्श पेशाला कलंक लागावा, अशा घटना सातत्याने घडताहेत. त्यात अजून एकाची भर पडली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एका शिक्षकाने ‘मला किस दे, तुला पास करतो’ अशी अश्लील मागणी विद्यार्थिनीकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विद्यार्थिनीकडे अश्लील मागणी करणाऱ्या शिक्षकाचे नाव डॉ. प्रदीप सिंग आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरला झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये डॉ. प्रदीप सिंग हे एका अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अत्यंत निर्लज्जपणे अश्लील बोलताना दिसत आहेत. यासोबत विद्यार्थिनीवर चुंबन आणि शारिरीक संबंधासाठी दबाव टाकतानाही दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थीनीने मोठ्या धाडसाने शिक्षकाच्या अश्लिल मागणीचा गुपचूप व्हिडिओ बनवला आणि त्याचा पर्दाफाश केला. आता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही वेळातच कॉलेज प्रशासनानेही कारवाई केली आणि डॉ. प्रदीप सिंग यांची चौकशी सुरू केली आहे.
सामान्यांमध्ये संतापाची लाट
डॉ. प्रदीप सिंग यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओने संतापाची लाट उसळली आहे. जौनपूरच्या टीडी कॉलेजमधील इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप सिंग यांच्यावर हा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे केवळ महाविद्यालयच नाही तर संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाला धक्का बसला आहे.
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/Gpraksh07/status/1661930303240421381?s=20
Teacher Student Demand Kiss Sexual Assault