इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात कधी काय घडेल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड ठेवले होते. तर आता राजस्थानमधील एका सरकारी कर्मचाऱ्याने चहावाल्यालाच कारणेदाखवा नोटीस पाठवली आहे.
दिवसभर मजुरी करून कशीबशी दोनवेळच्या जेवणाची सोय करणाऱ्या चहावाल्याला कारणेदाखवा नोटीस मिळाल्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधण्यात आले आहे. ब्लॉक को-ऑर्डीनेटरने पंचायत समितीच्या आवारात असलेल्या चहावाल्याला ही नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे नोटीस सोशल मिडियावर गाजत असून त्यावर मिम्सही तयार झाले आहेत. आणि खरे तर काहीही कारण नसताना राजस्थान सरकारलाही धारेवर धरले जात आहे.
चहावाल्याने ठरलेल्या वेळेत चहा दिलाच पाहिजे. अधिकाऱ्यांनी फोन केल्यावर तातडीने चहा यायलाच पाहिजे, असे नमूद करत या अधिकाऱ्याने चहा उशिरा का आला, याचे स्पष्टीकरण चहावाल्याला मागितले. त्यानंतर चहावाल्यानेही त्या नोटीशीला उत्तर दिले आहे. म्हशीचे दूध काढायला गेल्यामुळे उशीर झाल्याचे त्याने म्हटले. यापुढे म्हशीचे दूध आधीच काढून ठेवेन व वेळेत चहा पोहोचवेन, असे चहावाल्याने म्हटले आहे. नोटीस आणि चहावाल्याचे उत्तर सध्या सोशल मिडियावर मनोरंजनाचा भाग ठरत आहे.
असे कसे झाले?
खरे तर हा संपूर्ण प्रकार थट्टेपोटीच करण्यात आल्याचे उघड झाले. एका कॉम्प्युटर अॉपरेटरने साध्या कागदावर प्रिंट आऊट काढून हा प्रकार केला. अर्थात ती गंमत असली तरीही ब्लॉक को-अॉर्डीनेटरच्या नावाने असे करणे त्याला महागातही पडू शकले असते.
tea stall owner show cause notice rajasthan
panchayat samiti served